संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती
अहिल्यानगर : भगवान परशुराम परिक्रमेचे अहिल्यानगरमध्ये अमृत संस्थेच्या कार्यालयात उत्साहात स्वागत करण्यात आले. परिक्रेममधील मूर्ती आणि पादुकांचे पंचोपचार पूजन करण्यात आले. अहिल्यानगरमधून सुरू झालेली ही परिक्रमा मध्य प्रदेशात भगवान परशुराम यांच्या जानापाव येथील जन्मस्थळापर्यंत जाऊन परत अहिल्यानगरमध्ये आली. त्या वेळी हा कार्यक्रम झाला.
अहिल्यानगरमधील श्री चिरंजीव प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील विविध ब्राह्मण समाज संघटनांच्या संयुक्त विद्यमाने ही परिक्रमा आयोजित करण्यात आली होती. श्री चिरंजीव प्रतिष्ठानचे अध्यक्ष स्वप्नील देशमुख, उपाध्यक्ष शुभंकर गटणे, केतन बडवे, महेश देशपांडे, मुकेश साठ्ये, अमोल अवस्थी, चंद्रशेखर गटने, अविका गटने, पीयूष देशपांडे, प्रद्युम्न देशपांडे, मयुरी देशमुख, गायत्री कुलकर्णी, तुषार पागिरे आदी या वेळी उपस्थित होते.
या वेळी अमृत संस्थेचे राज्य व्यवस्थापक दीपक जोशी, नाशिक विभागीय व्यवस्थापक मंगेश खाडिलकर, जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे, अमृतसखी गौरी कुलकर्णी हेही उपस्थित होते.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
अधिक माहितीसाठी संपर्क : 9112228769
जिल्हा कार्यालय : वरुण अपार्टमेंट, आकाशवाणीसमोर,
प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर - 414003
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment