नागपूरमध्ये अमृत ग्राम सर्वेक्षणाबद्दल शासकीय अधिकाऱ्यांशी संवाद

सर्वेक्षणाच्या उपयुक्ततेबाबत करण्यात आली चर्चा

नागपूरमध्ये अमृत ग्राम सर्वेक्षणाबद्दल शासकीय अधिकाऱ्यांशी संवाद मुख्य फोटो
नागपूरमध्ये अमृत ग्राम सर्वेक्षणाबद्दल शासकीय अधिकाऱ्यांशी संवाद अतिरिक्त फोटो

नागपूर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे ग्राम सर्वेक्षणाचा उपक्रम राबवला जात आहे. त्याबाबत माहिती देण्यासाठी अमृत संस्थेच्या नागपूर कार्यालयातर्फे नागपुरातील विविध शासकीय अधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली.

जिल्हा माहिती अधिकारी अतुल पांडे यांना अमृत संस्थेच्या योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच नागपूर महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्त सौ. वैष्णवी बी. यांचीही भेट घेऊन योजनांच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यात आली.

अमृत संस्थेच्या नागपूर जिल्हा उपव्यवस्थापक सौ. वृषाली सवनकर आणि प्रतीक आकरे यांनी ग्राम सर्वेक्षणाचे उद्दिष्ट, त्याचे महत्त्व आणि लाभार्थ्यांपर्यंत योजना प्रभावीपणे पोहोचवण्याच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.

अमृत संस्थेच्या योजनांच्या माध्यमातून विद्यार्थी, तरुण, महिला, व्यावसायिक व शेतकरी या विविध घटकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवण्यासाठी हे सर्वेक्षण उपयुक्त ठरणार असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Harshal Gadre News publisher name | Date: 08-04-2026 News publication date | Time: 12:46 PM News publication time | Views: 370 Number of times this news has been viewed | District: nagpur Related district of the news
Publisher: Harshal Gadre News publisher name | Date: 08-04-2026 News publication date | Time: 12:46 PM News publication time | Views: 370 Number of times this news has been viewed | District: nagpur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement