अमृत संस्थेच्या योजनांची माहिती देण्यासाठी सांगलीत पटेल समाजाची बैठक

व्यवसायाला साह्यभूत ठरणाऱ्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

अमृत संस्थेच्या योजनांची माहिती देण्यासाठी सांगलीत पटेल समाजाची बैठक मुख्य फोटो
मुख्य फोटो

सांगली : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या योजनांची आणि परिवार सर्वेक्षण अभियानाची माहिती देण्यासाठी पटेल समाजातील प्रमुख मंडळींची बैठक पाटीदार भवन येथे घेण्यात आली. यात पटेल समाज मंडळाचे प्रमुख रविभाई पटेल आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

या बैठकीत अमृत संस्थेचे सांगली जिल्हा व्यवस्थापक शैलेंद्र जहागीरदार यांनी अमृत संस्थेबाबत माहिती दिली. तसेच अमृत संस्था राबवत असलेल्या विविध उपक्रमांबद्दल सांगितले. विविध योजनांबाबत थोडक्यात माहिती देऊन त्यांचा लाभ घेण्याबाबत आवाहन केले. अमृत संस्थेच्या परिवार सर्वेक्षण अभियानात परिवाराची नोंदणी करून लक्ष्यित गटातील कुटुंबांनी आपली माहिती देण्याचे आवाहनही जहागीरदार यांनी केले. लवकरच पटेल समाजाचा अमृत मेळावा आयोजित करण्याबाबत या वेळी चर्चा झाली. व्यवसायात अग्रस्थानी असलेला पटेल समाज अमृत संस्थेच्या योजनांच्या साह्याने नवी उंची गाठू शकेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. 

अधिक माहितीसाठी संपर्क :

अमृत - सांगली जिल्हा कार्यालय - 9112228766

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत),

अप्पर तहसील कार्यालयासमोर,

राजवाडा, सांगली

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Shailendra Jahagirdar News publisher name | Date: 07-04-2026 News publication date | Time: 06:09 PM News publication time | Views: 283 Number of times this news has been viewed | District: sangli Related district of the news
Publisher: Shailendra Jahagirdar News publisher name | Date: 07-04-2026 News publication date | Time: 06:09 PM News publication time | Views: 283 Number of times this news has been viewed | District: sangli Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 1 Comments

U
Umesh Raut
08-04-2026 10:48 AM

Gopal Nagar Amravati Maharashtra
7745859060

Write a Comment
0 / 50 words
Advertisement