संस्थेला सहकार्य करण्याची व्यक्त केली भावना
अहिल्यानगर : परशुराम हिंदू सेवा संघाचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष व अहिल्यानगर महापालिकेच्या नगरसेविका सुनीता कुलकर्णी यांचे चिरंजीव पुष्कर कुलकर्णी यांनी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या अहिल्यानगर कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी त्यांचा यथोचित सन्मान केला. या वेळी नीलेश जाधव व सूरज कुरलियेदेखील उपस्थित होते. अमृत संस्थेला नेहमी सहकार्य करण्याची सकारात्मकता त्यांनी दाखवली.
अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक : 9112228769
पत्ता : अमृत कार्यालय, आकाशवाणी केंद्रासमोर,
प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर - ४१४००३
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment