कोल्हापूरमध्ये अमृत कौशल्य उद्यम प्रशिक्षण उपक्रमाला मिळणार अधिक बळ

जिल्हा कौशल्य मार्गदर्शन कार्यालयाचे सहायक आयुक्त जमीर करीम यांनी दिली सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही

कोल्हापूरमध्ये अमृत कौशल्य उद्यम प्रशिक्षण उपक्रमाला मिळणार अधिक बळ मुख्य फोटो
मुख्य फोटो

कोल्हापूर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे कोल्हापूरमध्ये कौशल्य विकास उद्यम प्रशिक्षण उपक्रम राबवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने अमृत संस्थेचे कोल्हापूर जिल्हा व्यवस्थापक प्रशांत जोशी यांनी जिल्हा कौशल्य, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कार्यालयाचे सहायक आयुक्त जमीर करीम यांची भेट घेतली.

या भेटीमध्ये कौशल्य विकास उद्यम प्रशिक्षणाच्या विविध बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रशिक्षणाच्या माध्यमातून युवकांना स्वयंरोजगाराच्या संधी कशा उपलब्ध करून देता येतील, याबाबत सकारात्मक संवाद झाला.

या वेळी करीम यांनी या उपक्रमाचे कौतुक करून भविष्यात या कार्यासाठी आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. त्यांच्या या सहकार्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अमृत कौशल्यविकास उपक्रमाला अधिक बळ मिळणार असून, स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत. या उपक्रमामुळे उद्योजकतेला चालना मिळून अनेकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी नवी प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Prashant Joshi News publisher name | Date: 07-04-2026 News publication date | Time: 03:36 PM News publication time | Views: 479 Number of times this news has been viewed | District: kolhapur Related district of the news
Publisher: Prashant Joshi News publisher name | Date: 07-04-2026 News publication date | Time: 03:36 PM News publication time | Views: 479 Number of times this news has been viewed | District: kolhapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement