अर्ज करण्याची मुदत ३० एप्रिल २०२६पर्यंतच...
वर्धा : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनाच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या स्वायत्त संस्थेतर्फे विविध कौशल्यविकास व अर्थसाह्य योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहेत. त्याअंतर्गत जीसीसी-टीबीसी (शासकीय टायपिंग व शॉर्टहँड) परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शुल्कपरताव्याच्या स्वरूपात आर्थिक मदत दिली जाते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे जानेवारी २०२६मध्ये घेण्यात आलेल्या जीसीसी-टीबीसी अर्थात टायपिंग व शॉर्टहँड परीक्षेचा निकाल १० मार्च २०२६ रोजी जाहीर झाला आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील उमेदवारांना या अर्थसाह्य योजनेचा लाभ घेता येईल.
अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटात खुल्या प्रवर्गातील ब्राह्मण, कायस्थ, कोमटी, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, वैश्य, नायर, नायडू, कम्मा, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, हिंदू नेपाळी, भूमिहार, लोहाणा, कानबी आदी जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या घटकांचा समावेश होतो. या जातींमधील विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क प्रतिपूर्तीचा लाभ घेण्यासाठी https://mahaamrut.org.in या अमृत संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर ३० एप्रिल २०२६पर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रांची हार्ड कॉपी अमृत संस्थेच्या जिल्हा कार्यालयात सादर करणे बंधनकारक आहे. ऑनलाइन अर्जासोबत खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.
१) उत्पन्नाचे ताजे प्रमाणपत्र अथवा आर्थिक दुर्बल प्रमाणपत्र.
२) राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाइल सर्टिफिकेट)
३) लक्ष्यित गटाची जात नमूद असलेला शासकीय पुरावा (उदा. T.C./L.C./ शालेय निर्गम उतारा इ.)
४) परीक्षा (जानेवारी २०२६) उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
५) बँक खाते तपशीलासाठी बँकेचे पासबुक/ रद्द केलेला धनादेश (Cancelled Cheque) याची स्पष्ट प्रत
६) आधार कार्ड
७) पॅन कार्ड
अधिक माहितीसाठी संपर्क :
अमृत जिल्हा कार्यालय, प्रशासकीय भवन,
तळमजला, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, वर्धा
मोबाइल : ९११२२२७६३२
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment