रत्नागिरीत अमृत संस्थेतर्फे लवकरच होणार बेकरी आणि सूर्यमित्र प्रशिक्षण कार्यक्रम

अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या सहकार्याने रत्नागिरीत लवकरच बेकरी प्रशिक्षण आणि सूर्यमित्र प्रशिक्षण कार्यक्रम घेतले जाणार आहेत.

फोटो उपलब्ध नाहीत

या बातमीशी संबंधित कोणतेही फोटो उपलब्ध नाहीत

रत्नागिरी : अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे रत्नागिरीत लवकरच बेकरी प्रशिक्षण आणि सूर्यमित्र प्रशिक्षण कार्यक्रम घेतले जाणार आहेत. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या सहकार्याने (एमसीईडी) हे प्रशिक्षण कार्यक्रम घेतले जाणार असून, आज (२० डिसेंबर) दोन्ही संस्थांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अमृत संस्थेच्या रत्नागिरी जिल्हा कार्यालयात ही बैठक झाली.

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेली राज्य शासनाची स्वायत्त संस्था आहे. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या सहकार्याने ही संस्था विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबवते. रत्नागिरीत झालेल्या आजच्या बैठकीत युवक व महिलांच्या कौशल्यविकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षण योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला एमसीईडीचे प्रकल्प अधिकारी रामचंद्र गावडे, तसेच प्रतिनिधी सौ. धनश्री खंडागळे उपस्थित होत्या. अमृत संस्थेचे रत्नागिरी जिल्हा व्यवस्थापक संतोष जुवळे, उपव्यवस्थापक अवधूत मुळ्ये यांनी उपस्थित राहून चर्चेत सहभाग घेतला. कोकण विभागीय व्यवस्थापक अमित सामंतदेखील या वेळी उपस्थित होते.

अमृत बेकरी प्रशिक्षण योजना, तसेच अमृत सूर्यमित्र प्रशिक्षण योजना याबाबत या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. आगामी काळात रत्नागिरी जिल्ह्यात या दोन्ही प्रशिक्षणांच्या बॅचेस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे स्थानिक युवकांना स्वयंरोजगार आणि कौशल्याधारित रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. अमृत व एमसीईडी यांच्या संयुक्त प्रयत्नातून जिल्ह्यात उद्योजकता विकासाला चालना मिळणार असून, प्रशिक्षणाच्या माध्यमातून इच्छुक लाभार्थी आर्थिक सक्षमतेकडे वाटचाल करतील, विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.

अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/

Publisher: संतोष जुवळे News publisher name | Date: 20-12-2025 News publication date | Time: 12:00 AM News publication time | Views: 95 Number of times this news has been viewed | District: ratnagiri Related district of the news
Publisher: संतोष जुवळे News publisher name | Date: 20-12-2025 News publication date | Time: 12:00 AM News publication time | Views: 95 Number of times this news has been viewed | District: ratnagiri Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words