आनंदाचे डोही, आनंद तरंग...! बालगोपाळांनी लुटला 'आनंदमेळ्या'चा अमृतानंद

अमृत संस्थेतर्फे सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील शिगावमध्ये आयोजन

आनंदाचे डोही, आनंद तरंग...! बालगोपाळांनी लुटला 'आनंदमेळ्या'चा अमृतानंद मुख्य फोटो
आनंदाचे डोही, आनंद तरंग...! बालगोपाळांनी लुटला 'आनंदमेळ्या'चा अमृतानंद अतिरिक्त फोटो

सांगली : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी म्हणजेच अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे किशोर विकास उपक्रमांतर्गत निवासी अमृत आनंदमेळ्याचे आयोजन सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील शिगाव येथे करण्यात आले होते. या मेळ्यात ४५ मुले सहभागी झाली होती.

मुलांना घडवणे म्हणजे ओल्या मातीला घड्याचा आकार देण्यासारखे आहे. कुंभार मातीला आपल्या हातातील कौशल्याने सुंदर आकार देतो, त्या पद्धतीने अमृत संस्थेतर्फे संस्कारक्षम व देशभक्त नवीन पिढी घडवण्यासाठी आनंदमेळ्याच्या माध्यमातून किशोरवयीन मुलांमध्ये नेतृत्वगुण, टीम स्पिरीट (संघभावना), देशभक्ती, बंधुभाव, संवेदनशीलता, संस्कार, कौटुंबिक मूल्ये इत्यादी गुण विकसित व्हावे यासाठी आनंदमेळा आयोजित करण्यात आला होता. यात विविध प्रकारची सत्रे घेण्यात आली. 

पहिल्या दिवशी विविध मैदानी खेळ, स्मरणशक्तीचे खेळ, संस्कारक्षम व बोधपर गोष्टी इत्यादी सत्रे घेण्यात आली. विविध व्यायामप्रकार, योगासने, प्राणायाम याने दुसऱ्या दिवसाची सुरुवात करण्यात आली. मुलांमध्ये भरपूर उत्साह होता. त्यानंतर काही मुलांनी स्वतःचे विविध कलागुण सादर केले. यामध्ये विविध प्रकारची देशभक्तिपर गीते, तसेच कथा सादर करण्यात आल्या. त्यानंतर विविध मैदानी खेळ घेण्यात आले. मुलांचे नेतृत्वकौशल्य विकसित होणे हा त्यामागचा उद्देश होता. अशा पद्धतीचा मेळावा शिगावमध्ये प्रथमच भरला होता. अमृत संस्थेचे सांगली जिल्हा व्यवस्थापक शैलेंद्र जहागीरदार व अमृतमित्र अभिजित कुलकर्णी यांनी हा मेळावा घेतला. या पहिल्या मेळाव्यानंतरची मुलांची प्रतिक्रिया खूपच चांगली होती. मोबाइल सोडून मित्रांसोबत खेळताना वेगळ्या वातावरणात गेल्यासारखे वाटले, अशी प्रातिनिधिक भावना या मुलांकडून व्यक्त झाली. प्रत्येक आठवड्यात असा मेळावा घेण्यात यावा, अशी मागणी मुलांनी केली. यावरूनच या मेळ्याची यशस्विता लक्षात येते.

अधिक माहितीसाठी संपर्क :

अमृत - सांगली जिल्हा कार्यालय - 9112228766

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत),

अप्पर तहसील कार्यालयासमोर,

राजवाडा, सांगली



Publisher: Shailendra Jahagirdar News publisher name | Date: 06-04-2026 News publication date | Time: 06:40 PM News publication time | Views: 2,545 Number of times this news has been viewed | District: sangli Related district of the news
Publisher: Shailendra Jahagirdar News publisher name | Date: 06-04-2026 News publication date | Time: 06:40 PM News publication time | Views: 2,545 Number of times this news has been viewed | District: sangli Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement