ब्राह्मण सभेच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
कोपरगाव : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था आणि ब्राह्मण सभा यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगावमध्ये (जि. अहिल्यानगर) अमृत संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. सायबर सिस्टीम हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मकरंद कोल्हाळकर यांनी केले. अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील स्त्री-पुरुषांना मार्गदर्शन करून अमृत संस्थेच्या सर्व योजनांची सविस्तर माहिती दिली.
या वेळी अमृतमित्र शरद क्षीरसागर यांच्यासह बी. डी. कुलकर्णी, संदीप देशपांडे, नितीन जोशी, प्रसाद ठोंबरे, दीपक पाठक, आशिष कुलकर्णी, सौ. स्मिता जोशी, सौ. रत्नप्रभा पाठक, सौ. प्राची ठोंबरे, स्मिता अनिल पोळ, सौ. शुभदा देशमुख, सौ. प्रतिभा कुलकर्णी, सुनील कमलाकर, सौ. राजश्री कुलकर्णी व महेंद्र कुलकर्णी आदी उपस्थित होते. बैठक आयोजित करण्यासाठी अमृतमित्र संदीप देशपांडे यांनी विशेष प्रयत्न केले. सायबर सिस्टीम हॉलचे संचालक श्रीकांत जोशी यांनी आभारप्रदर्शन केले.
अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक : 9112228769
पत्ता : अमृत कार्यालय, आकाशवाणी केंद्रासमोर,
प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर - ४१४००३
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment