स्थानिक उत्पादकांना मिळणार हक्काची बाजारपेठ; ग्राहकांना मिळणार दर्जेदार उत्पादने
जालना : स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि ग्राहकांना दर्जेदार वस्तू थेट उत्पादकांकडून उपलब्ध व्हाव्यात, याकरिता अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेने 'अमृतपेठ थेट बाजारपेठ' या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. हे प्रदर्शन येत्या ११ व १२ एप्रिल २०२६ रोजी भरवले जाणार असून, त्याचे तपशील बातमीच्या शेवटी दिले आहेत.
या प्रदर्शनामध्ये घरगुती खाद्यपदार्थ, हस्तकला वस्तू, कपडे, दागिने, तसेच विविध उपयुक्त वस्तूंचे स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. या माध्यमातून स्थानिक महिला व उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांची थेट विक्री करण्याची संधी मिळणार आहे. तसेच ग्राहकांना एकाच ठिकाणी विविध दर्जेदार वस्तू खरेदी करण्याची संधी मिळणार असल्याने या प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. आयोजकांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे, की या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे.
दिनांक : ११-१२ एप्रिल २०२६
वेळ : सकाळी १० ते रात्री ९
स्थळ : महेश भवन, मंठा चौफुली, जालना
अधिक माहितीसाठी संपर्क : 7391065474, 9421944752, 9881086777
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment