परतवाड्याच्या नगराध्यक्षा सौ. रूपाली माथने यांनी 'अमृतपेठ'ला भेट देऊन उद्योजकांशी साधला संवाद

अमृत संस्थेच्या कार्याचे केले कौतुक आणि अशा उपक्रमांसाठी सहकार्याची दिली ग्वाही

परतवाड्याच्या नगराध्यक्षा सौ. रूपाली माथने यांनी 'अमृतपेठ'ला भेट देऊन उद्योजकांशी साधला संवाद मुख्य फोटो
परतवाड्याच्या नगराध्यक्षा सौ. रूपाली माथने यांनी 'अमृतपेठ'ला भेट देऊन उद्योजकांशी साधला संवाद अतिरिक्त फोटो

परतवाडा (जि. अमरावती) : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेने आयोजित केलेल्या अमृतपेठ प्रदर्शनाचे उद्घाटन अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रवीण तायडे यांच्या हस्ते पार पडले. परतवाडा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. रूपाली माथने यांनी आवर्जून भेट दिली आणि सर्व स्टॉल्सची सविस्तर पाहणी केली. प्रत्येक उद्योजकाशी त्यांनी संवाद साधला आणि त्यांच्या उत्पादनांची माहिती घेऊन त्यांच्या कार्याचे मनापासून कौतुक केले.

या वेळी सौ. माथने यांनी अमृत संस्थेच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. त्या म्हणाल्या, 'अमृत संस्थेच्या माध्यमातून स्थानिक उद्योजक, महिला बचत गट आणि युवकांना एक सक्षम व्यासपीठ मिळत आहे. अशा उपक्रमांमुळे स्वावलंबन वाढते आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळते. परतवाडा शहरात अशा प्रकारचे उपक्रम आयोजित होणे ही अभिमानाची बाब असून, नगरपरिषद अशा उपक्रमांना पूर्ण सहकार्य करील.'

दोन दिवसांच्या या प्रदर्शनामध्ये स्थानिक उद्योजक, स्वयंरोजगार गट आणि महिला बचत गटांनी विविध उत्पादनांचे स्टॉल्स लावले असून नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. सहा एप्रिलला रात्री १० वाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : 7249451152, 9527317068

दिनांक आणि वेळ : पाच व सहा एप्रिल २०२६, सकाळी १० ते रात्री १०

स्थळ : शेवाळकर सभागृह, वाघामाता संस्थान, परतवाडा, जि. अमरावती

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Rushikesh Kathalkar News publisher name | Date: 05-04-2026 News publication date | Time: 05:34 PM News publication time | Views: 533 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news
Publisher: Rushikesh Kathalkar News publisher name | Date: 05-04-2026 News publication date | Time: 05:34 PM News publication time | Views: 533 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement