किशोर विकास उपक्रमांतर्गत आयोजन
सांगली : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी उपक्रम राबवले जातात. तसेच, सामाजिक बांधिलकीच्या नात्याने सर्व समाजातील विद्यार्थ्यांमध्ये व तरुण पिढीमध्ये देशप्रेम जागवण्यासाठी किशोर विकास उपक्रमाच्या माध्यमातून संस्था काम करते. या उपक्रमांतर्गत घेतल्या जाणाऱ्या अमृत वर्गांद्वारे लहान मुलांमध्ये नेतृत्वक्षमता, सुसंस्कार, कला-गुण आणि देशप्रेमाची भावना विकसित करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील शिगाव येथे अमृत आनंदमेळा आयोजित करण्यात आला आहे. या आनंदमेळ्यात मुलांसाठी बौद्धिक खेळ, प्रार्थना व संस्कार उपक्रम, शारीरिक व्यायाम आणि प्रेरणादायी कार्यक्रम यांचा समावेश असणार आहे. त्यामुळे मुलांच्या उज्ज्वल भविष्याकरिता अमृत संस्थेच्या या उपक्रमात आपल्या मुलांना पाठवावे, असे आवाहन संस्थेने केले आहे. उपक्रमात सहभागी होणाऱ्या मुलांनी आपले कपडे, तसेच अंथरुण-पांघरूण घेऊन यावे, असे आयोजकांनी कळवले आहे.
दिवस आणि वेळ : शनिवार, चार एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून रविवार, पाच एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत...
स्थळ : शिगाव, ता. वाळवा, जिल्हा सांगली
अधिक माहितीसाठी संपर्क :
अमृत - सांगली जिल्हा कार्यालय - 9112228766
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत),
अप्पर तहसील कार्यालयासमोर,
राजवाडा, सांगली
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment