ग्राहकांना दर्जेदार स्थानिक उत्पादने थेट उत्पादकांकडून वाजवी दरात खरेदीची संधी
सातारा : 'अमृतपेठ थेट बाजारपेठ' ही संकल्पना स्थानिक बाजारपेठेला बळकटी देणारी ठरेल. या माध्यमातून शेतकरी आणि छोटे व्यावसायिक थेट ग्राहकांशी जोडले गेल्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल आणि ग्राहकांनाही ताजी आणि दर्जेदार स्थानिक उत्पादने वाजवी दरात मिळतील,' असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. सातारा शहरात भरलेल्या अमृतपेठ थेट बाजारपेठेचे उद्घाटन अमृत संस्थेचे विभागीय व्यवस्थापक प्रथमेश कुलकर्णी आणि सामाजिक कार्यकर्ते अमित कुलकर्णी यांच्या हस्ते चार एप्रिलला झाले. हा सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. त्या वेळी मान्यवरांनी या उपक्रमाबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
स्थानिक उद्योजक, शेतकरी आणि लघु व्यावसायिकांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू करण्यात आलेली ही बाजारपेठ सातारकरांसाठी एक मोठी संधी ठरणार आहे. या उपक्रमामुळे साताऱ्यातील स्थानिक बाजारपेठ विकसित होऊन रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. 'व्होकल फॉर लोकल' या संकल्पनेला प्रोत्साहन देऊन स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
सातारकरांनी या अमृतपेठ थेट बाजारपेठेचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा, स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन द्यावे आणि आपल्या शहराच्या आर्थिक विकासात हातभार लावावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
दिनांक : ४ आणि ५ एप्रिल २०२६. सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत
स्थळ : महिला मंडळ हॉल, राजवाडा, सातारा
स्टॉल बुकिंग आणि अधिक माहितीसाठी संपर्क : 9112227638
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 2 Comments
Kalyani Kulkarni
खूपच स्तुत्य आणि दूरदर्शी उपक्रम! 👏
‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’ ही संकल्पना शेतकरी, स्थानिक उद्योजक आणि ग्राहक यांच्यातील दुवा अधिक मजबूत करणारी आहे. यामुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळेल आणि ग्राहकांनाही ताजी, दर्जेदार उत्पादने वाजवी किमतीत उपलब्ध होतील, ही खूप आनंदाची बाब आहे.
Rakesh kohli
Really golden opportunity for locals to become vocal real high quality may take products to greatest high on success congratulations for great step taken by all involved wish a great future for all entrepreneurs who are taking it up . Please multiply these actions for betterment and progressive boosting economy
Write a Comment