अमृतपेठ थेट बाजारपेठ हा कौशल्य, श्रम व स्वप्नांना दिशा देणारा उपक्रम : सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूरमध्ये उद्घाटनप्रसंगी कौतुकोद्गार; आत्मनिर्भर भारताच्या दिशेने प्रेरक पाऊल असल्याची भावना

अमृतपेठ थेट बाजारपेठ हा कौशल्य, श्रम व स्वप्नांना दिशा देणारा उपक्रम : सुधीर मुनगंटीवार मुख्य फोटो
अमृतपेठ थेट बाजारपेठ हा कौशल्य, श्रम व स्वप्नांना दिशा देणारा उपक्रम : सुधीर मुनगंटीवार अतिरिक्त फोटो

चंद्रपूर : 'अमृतपेठ थेट बाजारपेठ हा कौशल्य, श्रम आणि स्वप्नांना दिशा देणारा उपक्रम असून, आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेले प्रेरणादायी पाऊल आहे,' असे कौतुकोद्गार माजी मंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी काढले. अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे चंद्रपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अमृतपेठ थेट बाजारपेठ या उपक्रमाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते तीन एप्रिल रोजी झाले. त्या वेळी ते बोलत होते. स्थानिक लघुउद्योजक आणि ग्राहक यांच्यातील विश्वासार्ह दुवा असलेला हा उपक्रम कन्यका परमेश्वरी सभागृहात पाच एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे.

'चंद्रपूरमध्ये उद्योग आणि उद्योजकतेचा नवा दीप प्रज्ज्वलित करताना मनापासून आनंद झाला. या महोत्सवातून लघुउद्योजकांच्या कर्तृत्वाला नवे व्यासपीठ मिळाले,' असे मुनगंटीवार म्हणाले. प्रशिक्षण, मार्गदर्शन व बाजारपेठ यांची सशक्त सांगड घालून हजारो युवक-युवतींना स्वावलंबनाकडे नेण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. जिद्द ठेवून ध्येयाच्या दिशेने वाटचाल करावी आणि उद्योजकतेच्या नव्या क्षितिजांकडे झेप घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. या महोत्सवाच्या माध्यमातून चंद्रपूरच्या विकासाचा बुलंद आवाज अधिक भक्कम आणि प्रभावीपणे उमटला, अशी भावनाही मुनगंटीवार यांनी या वेळी व्यक्त केली. या कार्यक्रमात मुनगंटीवार यांच्या हस्ते चंद्रपूर येथील अमृत सूर्यमित्र योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. 

अमृतपेठ थेट बाजारपेठ या उपक्रमाच्या माध्यमातून स्थानिक उत्पादक आणि लघुउद्योजकांना त्यांच्या उत्पादनांची थेट विक्री करण्यासाठी आणि ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक भक्कम व्यासपीठ उपलब्ध होत आहे. या विशेष बाजारपेठेत नागरिकांना विविध प्रकारचे स्वादिष्ट खाद्यपदार्थ, ट्रेंडी व पारंपरिक कपडे, घरगुती उपयोगाच्या वस्तू, कलात्मक हस्तकला वस्तू, दागदागिने, तसेच स्वदेशी उत्पादनांचा समावेश आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी हा एक वेगळा आणि आनंददायी अनुभव ठरणार आहे. व्होकल फॉर लोकल अर्थात स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देऊन स्थानिक उद्योजकांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या कार्यक्रमाला चंद्रपूरच्या महापौर सौ. संगीता खांडेकर, अमृत संस्थेचे विभागीय व्यवस्थापक देवदत्त पंडित, अमरावती विभागीय व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर, अमृत संस्थेचे चंद्रपूर जिल्हा व्यवस्थापक विक्रम मोहन पांडे, नागपूर जिल्हा व्यवस्थापक हर्षल गद्रे, वर्धा जिल्हा व्यवस्थापक ऋषिकेश खराटे, चंद्रपूर जिल्हा उपव्यवस्थापक आदित्य सेंगर, गडचिरोली जिल्हा उपव्यवस्थापक विजय चौधरी, अमृतमित्र सतीश नारायणदास, अमृतमित्र श्रीरंग खोंड, अमृतमित्र वेदांत मेहता, अमृतसखी वैष्णवी दारवेकर, अमृतसखी माधुरी रोटकर आदी सर्व जण उपस्थित होते. नागरिकांनी कुटुंबासह या प्रदर्शनाला भेट देऊन स्थानिक लघुउद्योजकांना प्रोत्साहन द्यावे आणि खरेदीचा आनंद घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेचे चंद्रपूर जिल्हा व्यवस्थापक विक्रम मोहन पांडे यांनी केले आहे. 

अमृतपेठ थेट बाजारपेठ

दिवस आणि वेळ : तीन ते पाच एप्रिल २०२६. सकाळी १० ते रात्री नऊ वाजेपर्यंत

स्थळ : कन्यका परमेश्वरी हॉल, कस्तुरबा रोड, चंद्रपूर.

अधिक माहितीसाठी संपर्क :

विक्रम मोहन पांडे – 9112228774

चंद्रपूर जिल्हा व्यवस्थापक, अमृत 

श्रीरंग खोंड – 7057909073 

वैष्णवीताई दारवेकर – 9689473020

जिल्हा कार्यालय पत्ता : गुरुद्वारा रोड, कृष्णा टॉवरजवळ, तुकूम, चंद्रपूर - 442402

ई-मेल : amrut.chandrapur.dm@mail.com

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: विक्रम मोहन पांडे News publisher name | Date: 04-04-2026 News publication date | Time: 11:15 AM News publication time | Views: 3,224 Number of times this news has been viewed | District: chandrapur Related district of the news
Publisher: विक्रम मोहन पांडे News publisher name | Date: 04-04-2026 News publication date | Time: 11:15 AM News publication time | Views: 3,224 Number of times this news has been viewed | District: chandrapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement