रिसोडमध्ये चार एप्रिलला अमृत आनंद मेळावा

मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यावर संस्कार करणारा निवासी उपक्रम

रिसोडमध्ये चार एप्रिलला अमृत आनंद मेळावा मुख्य फोटो
मुख्य फोटो

वाशिम : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी उपक्रम राबवले जातात. त्यांमध्ये किशोर विकास उपक्रमाचाही समावेश असूव, तो समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम आहे. या उपक्रमांतर्गत घेतल्या जाणाऱ्या अमृत वर्गांद्वारे लहान मुलांमध्ये नेतृत्वक्षमता, सुसंस्कार, कला-गुण आणि देशप्रेमाची भावना विकसित करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात.

दर शनिवारी लोणी येथील सखाराम महाराज हॉस्टेलमध्ये हा वर्ग उत्साहात पार पडतो. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आता अमृत आनंद मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या आनंद मेळाव्यात मुलांसाठी बौद्धिक खेळ, प्रार्थना व संस्कार उपक्रम, शारीरिक व्यायाम आणि प्रेरणादायी कार्यक्रम यांचा समावेश असणार आहे. त्यामुळे मुलांच्या उज्ज्वल भविष्याकरिता अमृत संस्थेच्या या उपक्रमात आपल्या मुलांना पाठवावे, असे आवाहन संस्थेने केले आहे. उपक्रमात सहभागी होणाऱ्या मुलांनी आपले कपडे, ताट-प्याला, तसेच अंथरुण-पांघरूण घेऊन यावे, असे आयोजकांनी कळवले आहे.

दिवस आणि वेळ : शनिवार, चार एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून रविवार, पाच एप्रिल रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत...

स्थळ : अमरदास बाबा संस्थान, रिसोड

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Yogesh Joshi News publisher name | Date: 03-04-2026 News publication date | Time: 08:16 PM News publication time | Views: 1,828 Number of times this news has been viewed | District: washim Related district of the news
Publisher: Yogesh Joshi News publisher name | Date: 03-04-2026 News publication date | Time: 08:16 PM News publication time | Views: 1,828 Number of times this news has been viewed | District: washim Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement