व्यवसायातील अडचणींवर मात करण्यासाठी योग्य नियोजन आणि सातत्याची गरज

कोल्हापुरातील अमृत ग्लॅमर प्रशिक्षणवर्गात विभागीय व्यवस्थापक प्रथमेश कुलकर्णींचे मार्गदर्शन

व्यवसायातील अडचणींवर मात करण्यासाठी योग्य नियोजन आणि सातत्याची गरज मुख्य फोटो
मुख्य फोटो

कोल्हापूर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेने आयोजित केलेला अमृत ग्लॅमर प्रशिक्षणवर्ग सध्या कोल्हापुरात गांधीनगरमध्ये सुरू आहे. अमृत संस्थेचे पुणे विभागीय व्यवस्थापक प्रथमेश कुलकर्णी यांनी या वर्गाला नुकतीच भेट दिली. या वेळी त्यांनी प्रशिक्षणार्थ्यांना व्यवसाय उभारणीसंदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले.

उद्योजकतेच्या संधी, कौशल्यविकासाचे महत्त्व आणि बदलत्या बाजारपेठेतील गरजा यावर कुलकर्णी यांनी सविस्तर भाष्य केले. तसेच, प्रशिक्षणानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

प्रशिक्षणार्थ्यांना उद्योग सुरू करण्यासाठी वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. या योजनेच्या माध्यमातून नवउद्योजकांना आर्थिक मदत मिळून त्यांचा व्यवसाय अधिक सक्षमपणे उभा राहू शकतो, असे त्यांनी सांगितले.

या मार्गदर्शनामुळे प्रशिक्षणार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिक स्वावलंबन साधण्याचा आत्मविश्वास त्यांच्यात वाढला आहे.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Prashant Joshi News publisher name | Date: 03-04-2026 News publication date | Time: 03:39 PM News publication time | Views: 1,014 Number of times this news has been viewed | District: kolhapur Related district of the news
Publisher: Prashant Joshi News publisher name | Date: 03-04-2026 News publication date | Time: 03:39 PM News publication time | Views: 1,014 Number of times this news has been viewed | District: kolhapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement