'अमृत'च्या योजनांच्या प्रसार-प्रचारासाठी डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करण्याचा प्रशिक्षणार्थ्यांचा संकल्प

अमृत आणि एमसीईडी यांच्यातर्फे नागपुरात आयोजित डिजिटल मार्केटिंग प्रशिक्षणवर्गाचा समारोप

'अमृत'च्या योजनांच्या प्रसार-प्रचारासाठी डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करण्याचा प्रशिक्षणार्थ्यांचा संकल्प मुख्य फोटो
'अमृत'च्या योजनांच्या प्रसार-प्रचारासाठी डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करण्याचा प्रशिक्षणार्थ्यांचा संकल्प अतिरिक्त फोटो

नागपूर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र अर्थात एमसीईडी यांच्या संयुक्त विद्यमाने डिजिटल मार्केटिंग प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याचा नुकताच समारोप झाला. समारोप कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्ज्वलन करून करण्यात आली.

या वेळी अमृत संस्थेचे नागपूर जिल्हा व्यवस्थापक हर्षल गद्रे आणि 'एमसीईडी'चे महाराष्ट्र समन्वयक श्रीकांत कुलकर्णी उपस्थित होते. मान्यवरांनी प्रशिक्षणार्थ्यांना डिजिटल मार्केटिंगचे महत्त्व, व्यवसायवृद्धीच्या संधी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी अमृत संस्थेच्या विविध योजनांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करण्याचा संकल्प व्यक्त केला. या उपक्रमामुळे नवउद्योजकांना नवी दिशा मिळाली असून, अमृत संस्थेच्या विविध योजना अधिक व्यापक स्तरावर पोहोचण्यास मदत होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Harshal Gadre News publisher name | Date: 03-04-2026 News publication date | Time: 11:17 AM News publication time | Views: 430 Number of times this news has been viewed | District: nagpur Related district of the news
Publisher: Harshal Gadre News publisher name | Date: 03-04-2026 News publication date | Time: 11:17 AM News publication time | Views: 430 Number of times this news has been viewed | District: nagpur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement