महिला व लघुउद्योजकांना नवे व्यासपीठ; ग्राहकांना दर्जेदार स्थानिक वस्तू खरेदी करण्याची संधी
पुणे : खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी आणि उद्योजकतावाढीसाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था कार्यरत आहे. स्थानिक उद्योजकांना चांगली बाजारपेठ मिळावी आणि नागरिकांना दर्जेदार स्वदेशी उत्पादने थेट उत्पादकांकडून खरेदी करता यावीत, यासाठी संस्थेतर्फे अमृतपेठ थेट बाजारपेठ हा उपक्रम राबवला जातो. येत्या चार एप्रिलला पुण्यात धायरीमध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे.
स्थानिक महिला उद्योजक व लघुउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी अमृत संस्था आणि संस्कृती व्यावसायिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले हे प्रदर्शन उद्योजकांसाठी एक भव्य आणि हक्काचे व्यासपीठ ठरणार आहे. या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असून, ग्राहकांना खरेदीचा एक वेगळा अनुभव मिळणार आहे. प्रदर्शनात मनमोहक ज्वेलरी, स्टायलिश कपडे, अस्सल घरगुती पदार्थ, किड्स आयटम्स, आकर्षक आर्ट व हस्तकला उत्पादने, तसेच विविध स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा समावेश असणार आहे.
स्थानिक उद्योजकांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळावी, तसेच त्यांच्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. विशेषतः महिलांच्या स्वावलंबनाला चालना देणे हा या प्रदर्शनामागील मुख्य हेतू असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
अमृतपेठ थेट बाजारपेठ
दिवस आणि वेळ : ४ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३ वाजल्यापासून
स्थळ : गणेश नक्षत्रम्, सोसायटी हॉल, डीएसके गेटजवळ, धायरी
अधिक माहितीसाठी संपर्क :
अमृत जिल्हा कार्यालय : 9112228767
योगिनी जोशी : 9067079989
गायत्री जवळगीकर : 9518598653
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment