विटा येथील अमृत मेळाव्यातून इच्छुक लाभार्थ्यांना मिळाली योजनांची माहिती

उद्योजक होण्याची संधी

फोटो उपलब्ध नाहीत

या बातमीशी संबंधित कोणतेही फोटो उपलब्ध नाहीत

विटा (जि. सांगली) : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेने १६ डिसेंबर २०२५ रोजी सांगली जिल्ह्यातील विटा येथील गणपती मंदिरात अमृत मेळावा घेतला. अमृत संस्थेच्या योजना लक्ष्यित गटातील व्यक्तींपर्यंत पोहोचाव्यात, याकरिता हा मेळावा घेण्यात आला.

अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील जातींसाठी काम करते. खुल्या प्रवर्गातील अशा जाती ज्यांना अन्य कोणत्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींतील आर्थिक दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट असून, त्यात ब्राह्मण, राजपुरोहित, बनिया, कम्मा, कायस्थ, अय्यंगार, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, ठाकूर, त्यागी, सेनगुनथर, गुजराती, जाट, सिंधी, कानबी, राजपूत, कोमटी, हिंदू मारवाडी इत्यादी जातींचा समावेश आहे.

कुटुंबातील प्रत्येक घटकासाठी म्हणजे विद्यार्थी, तरुण, महिला, पुरुष, उद्योजक, शेतकरी, पुरोहित अशा सर्वांसाठी अमृत संस्था वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून काम करते. या योजनांची माहिती सर्वांना देण्यासाठी अमृत मेळावा आयोजित करण्यात आला होता.
अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक शैलेंद्र जहागीरदार यांनी अमृत संस्थेच्या विविध प्रशिक्षण योजना, विद्यार्थ्यांसाठीच्या शैक्षणिक योजना, व्यवसायिकांसाठी वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजना, तसेच युवकांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम, उपक्रम व इतर सर्व योजनांबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच उपस्थितांच्या मनातील शंकांचे निरसन केले व प्रश्नांची उत्तरे दिली. अमृत मित्र अभिजित कुलकर्णी यांनी उपस्थितांना आवश्यक कागदपत्रांबद्दल व निवड निकषांबद्दल सविस्तर माहिती दिली. इच्छुकांनी या योजनांचा लाभ करू घ्यावा असे आवाहन केले. आभारप्रदर्शनाने मेळाव्याचा समारोप झाला.

Publisher: Shailendra Jahagirdar News publisher name | Date: 19-12-2025 News publication date | Time: 12:00 AM News publication time | Views: 52 Number of times this news has been viewed | District: sangli Related district of the news
Publisher: Shailendra Jahagirdar News publisher name | Date: 19-12-2025 News publication date | Time: 12:00 AM News publication time | Views: 52 Number of times this news has been viewed | District: sangli Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words