विशेष कार्यक्रमाचे आयोजन
गडचिरोली :येथील तुळजाभवानी प्राथमिक शाळेत हनुमान जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने कार्यक्रमाचे नियोजन केले होते. विद्यार्थ्यांनी मारुतीराया, श्रीराम, सीता यांच्या वेशभूषा केल्या होत्या. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या गडचिरोली कार्यालयातील अधिकारी व कर्मचारीही या कार्यक्रमात आवर्जून सहभागी झाले होते. त्यात सौ. माधुरी रोटकर, गौरव दुपल्लीवर, विजय चौधरी आणि वेदांत मेहता यांचा समावेश होता.
या शाळेमध्ये संपूर्ण वर्षभर हिंदू समाजातील सर्व महत्त्वपूर्ण सण-उत्सव साजरे करून संस्कृतीचा वारसा जपला जातो. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कुंदन टिकले यांच्या नेतृत्वाखाली शाळेत अनेक सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात. थोर व्यक्तींचे पुण्यस्मरणही केले जाते.
फक्त शिक्षणाच्या माध्यमातून नव्हे, तर त्याच्या जोडीला आणखीही अन्य प्रभावी मार्गांतून वारसा, इतिहास आदी बाबी विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम मुख्याध्यापिका सौ. टिकले यांच्या संकल्पनेतून या शाळेत केले जाते.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment