अमृत संस्थेच्या नागपूर विभागीय बैठकीत अधिक प्रभावी कार्यासाठी नियोजन

योजनांचा प्रभावी प्रसार, लाभार्थ्यांची अचूक निवड आणि युवकांमध्ये उद्योजकतेची बीजे लवकर रोवण्याचे नियोजन

अमृत संस्थेच्या नागपूर विभागीय बैठकीत अधिक प्रभावी कार्यासाठी नियोजन मुख्य फोटो
अमृत संस्थेच्या नागपूर विभागीय बैठकीत अधिक प्रभावी कार्यासाठी नियोजन अतिरिक्त फोटो

नागपूर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. अमृत संस्थेच्या नागपूर विभागीय बैठकीत आदिवासी विभागाचे सेवानिवृत्त आयुक्त विनोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली. योजनांचा प्रभावी प्रसार, योग्य लाभार्थ्यांची अचूकपणे निवड आणि युवकांमध्ये लवकर उद्योजकता रुजवणे या तीन बाबींवर पुढील काळात अधिक लक्ष केंद्रित करण्याचे या बैठकीत ठरवण्यात आले. या बैठकीला नागपूर विभागातील सर्व जिल्हा व्यवस्थापक व उपव्यवस्थापक उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला अमृत संस्थेच्या कार्याची सविस्तर माहिती विभागीय व्यवस्थापक देवदत्त पंडित यांनी दिली. शासकीय कर्मचाऱ्यांनी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कोणत्या पद्धतीने कार्य केले पाहिजे याबाबत मार्गदर्शन करून त्यांनी सुसंवाद घडवून आणला. यानंतर झालेल्या चर्चेत शासकीय कर्मचाऱ्यांशी समन्वय साधून प्रत्यक्ष लाभार्थी कसे शोधावेत याबद्दल सखोल मार्गदर्शन करण्यात आले. योजनांचा खरा लाभ योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचवण्यासाठी स्थानिक पातळीवर सक्रिय संवाद, नेटवर्किंग आणि प्रत्यक्ष संपर्क यांवर भर देण्यात आला.

विनोद पाटील यांनी विशेषतः उद्योजकता मानसिकता विकसित करण्यावर भर देऊन सांगितले, की 'विद्यार्थ्यांच्या मनात उद्योजकतेची बीजे त्यांच्या कॉलेजच्या पहिल्या वर्षापासूनच पेरली पाहिजेत. त्यामुळे ते शिक्षण पूर्ण होईपर्यंत नोकरी शोधणारे न बनता, स्वतःचे उद्योग उभे करणारे सक्षम उद्योजक म्हणून घडतील.'

या बैठकीत नागपूर विभागातील वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया व नागपूर या जिल्ह्यांचे जिल्हा व्यवस्थापक व उपव्यवस्थापकांनी चर्चेत सक्रिय सहभाग नोंदवला. त्यांनी आपल्या क्षेत्रातील अनुभवही मांडले.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Harshal Gadre News publisher name | Date: 01-04-2026 News publication date | Time: 06:21 PM News publication time | Views: 638 Number of times this news has been viewed | District: nagpur Related district of the news
Publisher: Harshal Gadre News publisher name | Date: 01-04-2026 News publication date | Time: 06:21 PM News publication time | Views: 638 Number of times this news has been viewed | District: nagpur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement