हिंगोली : आजच्या डिजिटल युगात मोबाइलद्वारे फिल्ममेकिंग, रील्स आणि शॉर्ट फिल्म्स यांना मोठी मागणी निर्माण झाली आहे. हीच गरज ओळखून अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेने मोबाइल फिल्म-मेकिंगचा प्रोफेशनल कोर्स सुरू केला आहे. या कोर्सद्वारे युवक-युवतींना त्यांच्या मोबाइल कॅमेरातून क्रिएटिव्ह करिअर घडवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. नवशिक्यांपासून ते सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर्सपर्यंत सर्वांसाठी हा कोर्स अत्यंत उपयुक्त आहे.

कोर्समध्ये काय शिकवले जाणार?
या प्रशिक्षणात सिनेमॅटिक शॉटची तंत्रे, प्रकाशयोजना, फ्रेमिंग आणि आवाजाची मूलभूत तत्त्वे, प्रोफेशनल मोबाइल एडिटिंग अॅप्स, स्टोरीटेलिंग आणि स्क्रिप्ट रायटिंगचे प्राथमिक ज्ञान, सोशल मीडिया रील्स आणि शॉर्ट फिल्म्सची निर्मिती, फ्रीलान्सिंगची संधी आणि पोर्टफोलिओ तयार करणे यांसारखे प्रत्यक्ष अनुभवावर आधारित प्रशिक्षण दिले जाणार आहे.
हा कोर्स का महत्त्वाचा?
हा कोर्स भरपूर मागणी असलेले कौशल्य विकसित करणारा असून, पूर्णपणे प्रात्यक्षिकांवर आधारित आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञ यात मार्गदर्शन करणार आहेत. नवीन शिकू इच्छिणाऱ्यांसाठी हा कोर्स उत्तम आहे. हा कोर्स युवकांना स्वयंरोजगार व करिअरच्या नवीन संधी उपलब्ध करून देणारा आहे.
अर्ज प्रक्रिया
इच्छुक उमेदवारांनी खालील लिंकवर ऑनलाइन अर्ज करावा :
https://app.mahaamrut.org.in/amrut-new/
नोंदणीसाठी संपर्क
श्रीकांत धोत्रे - 7391065471
(हिंगोली जिल्हा व्यवस्थापक, अमृत)
संजय रामराव मेथेकर - 91582 08063
(हिंगोली जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत)
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment