लक्ष्यित गटातील स्त्री-पुरुष व्यावसायिकांची उपस्थिती
अहिल्यानगर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी आणि उद्योजकतावाढीसाठी कार्यरत आहे. या संस्थेच्या योजनांची माहिती देण्यासाठी अमृत संस्थेच्या अहिल्यानगर कार्यालयात लक्ष्यित गटातील व्यावसायिक महिला व पुरुष यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
सुरुवातीला प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर नचिकेत रसाळ यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी उपस्थितांना अमृत संस्थेच्या सर्व योजनांची सविस्तर माहिती दिली. व्याजपरतावा योजना, ईडीपी प्रशिक्षण, अमृतपेठ, अमृत उद्योग कौशल्यवर्धन प्रशिक्षण यांसह शैक्षणिक योजनांच्या माहितीचा समावेश होता. एकूण ३२ व्यावसायिक उपस्थित होते. त्यापैकी सुमारे १८ महिला होत्या. उपस्थित उद्योजकांमध्ये नचिकेत रसाळ, प्रफुल्ल नातू, श्रीपाद फाटक, सचिन फाटक, मुकेश साठ्ये, सचिन साठ्ये, स्मिता साठ्ये आदींचा समावेश होता. श्रीपाद फाटक यांनी आभारप्रदर्शन केले.
अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक : 9112228769
पत्ता : अमृत कार्यालय, आकाशवाणी केंद्रासमोर,
प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर - ४१४००३
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment