अमृत संस्थेतर्फे ठाण्यात मोफत बेकरी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू

ठाणे : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे ठाण्यात सध्या महिन्याभराचा बेकरी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू असून, तो ११ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.

अमृत संस्थेतर्फे ठाण्यात मोफत बेकरी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू मुख्य फोटो
अमृत संस्थेतर्फे ठाण्यात मोफत बेकरी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू अतिरिक्त फोटो

ठाणे : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे ठाण्यात सध्या महिन्याभराचा बेकरी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू असून, तो ११ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी ठाणे जिल्हा व्यवस्थापक दर्शन कंबारी, जिल्हा उप-व्यवस्थापक माया रत्नपारखी-खेत्रे, ट्रेनिंग सेंटरच्या संचालिका सुषमा काळे आणि सुरेश काळे आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या (एमसीईडी) सहकार्याने हा प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जात आहे. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या स्वागताने झाली. तसेच लाभार्थ्यांनाही पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. शेल कॉलेज ऑफ हॉटेल टुरिझम या संस्थेत हा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू आहे. संस्थेचे संचालक सुषमा काळे आणि सुरेश काळे यांनी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी सुबोध बायस, संध्या येवले यांच्यासह मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अमृत संस्थेने हे प्रशिक्षण आयोजित केले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात महिलांना केक, ब्रेड, बिस्किटे, पेस्ट्री, कुकीज, तसेच इतर बेकरी पदार्थ तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच बेकरी व्यवसायासाठी आवश्यक असलेली स्वच्छता, साहित्याचे योग्य मोजमाप, ओव्हनचा वापर, पॅकिंग व विक्रीसंदर्भातील सर्व बाबींबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले जात आहे. मान्यवरांनी स्वयंरोजगार, तसेच अमृत आणि एमसीईडी या दोन्ही संस्थांतर्फे चालवल्या जाणाऱ्या संयुक्त कोर्सेसची माहिती दिली. अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. पुढील बॅचमध्ये नोंदणीसाठी संपर्क : माया रत्नपारखी-खेत्रे 81083 83871 अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

Publisher: Maya Ratnaparkhi-Khetre News publisher name | Date: 19-12-2025 News publication date | Time: 12:00 AM News publication time | Views: 1,433 Number of times this news has been viewed | District: thane Related district of the news
Publisher: Maya Ratnaparkhi-Khetre News publisher name | Date: 19-12-2025 News publication date | Time: 12:00 AM News publication time | Views: 1,433 Number of times this news has been viewed | District: thane Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words