खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या राज्य शासनाच्या अमृत संस्थेचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जीसीसी-टीबीसी अर्थात शासकीय टायपिंग व शॉर्टहँड परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शुल्क परताव्याच्या स्वरूपात आर्थिक मदत दिली जात आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे जानेवारी २०२६मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल १० मार्च २०२६ रोजी जाहीर झाला. या परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अमृत संस्थेकडून ही अर्थसाह्य योजना राबवली जात आहे. या योजनेचा लाभ अमृत संस्थेच्या निकषांमध्ये बसणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करणे बंधनकारक असून, सर्व कागदपत्रांच्या सेल्फ-अटेस्टेड प्रती जोडणे आवश्यक आहे, अशी माहिती अमृत संस्थेचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे यांनी दिली. लक्ष्यित गटातील विद्यार्थ्यांकडून अर्ज ३० एप्रिल २०२७पर्यंत मागविण्यात येणार असून, सर्वांनी लवकरात लवकर आपली कागदपत्रे जमा करावीत, असे आवाहनही करण्यात आले आहे. अमृत संस्थेच्या या उपक्रमाचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संबंधितांनी आपल्या जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा.
आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे :
आधारकार्ड, पॅनकार्ड, जातीचा उल्लेख असलेले टीसी, उत्पन्न दाखला किंवा आर्थिक मागास वर्गाचे प्रमाणपत्र (सन २०२५-२६ किंवा २०२६-२७पर्यंत वैध), डोमिसाइल सर्टिफिकेट (अधिवास प्रमाणपत्र), बँक पासबुक, परीक्षा फी भरल्याची पावती, परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, एक पासपोर्ट फोटो, तसेच कोऱ्या कागदावर सही.
अधिक माहितीसाठी संपर्क :
अक्षय लंबे - 7391065475
छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक, अमृत
योगेश रोडे - 9403200606
जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत
रामेश्वर साळुंके - 8010095930
अमृतमित्र
पत्ता : अमृत संस्थेचे विभागीय व जिल्हा कार्यालय
पुंडलिक नगर रोड, सेक्टर - ४ सिडको,
हनुमाननगर, पाण्याच्या टाकीजवळ,
छत्रपती संभाजीनगर - ४३१००९
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 6 Comments
Apurva pawar
Very nice chan khup chan khup khup chan
Apurva pawar
Good
Rajveer
Rajveer siddeshwar Kumbhar
Pratiksha Jadhav
Yes
Seati balashaheb kawade
This is a nice yojana for typing holder.i hope this add come true.this yojana economically help people.a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z a b c dd eff g h j
Write a Comment