स्थानिक संधींवर आधारित व्यवसाय उभारणी करा; जाफराबादमध्ये अमृत संस्थेच्या कार्यक्रमातून आवाहन

जाफराबाद : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या वतीने जाफराबाद (जि. जालना) येथे अमृत लक्ष्यित घटकातील महिलांसाठी व्यवसाय परिचय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात स्थानिक संधींवर आधारित व्यवसाय उभारणीचा संदेश देण्यात आला.

फोटो उपलब्ध नाहीत

या बातमीशी संबंधित कोणतेही फोटो उपलब्ध नाहीत

जाफराबाद : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या वतीने जाफराबाद (जि. जालना) येथे अमृत लक्ष्यित घटकातील महिलांसाठी व्यवसाय परिचय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात स्थानिक संधींवर आधारित व्यवसाय उभारणीचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून अमृत संस्थेचे जालना जिल्हा व्यवस्थापक नितीन खेकाळे उपस्थित होते. या वेळी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे जालना येथील प्रोग्राम ऑर्गनायझर वैभव मोकळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शन करताना नितीन खेकाळे यांनी व्यवसाय उभारणीची प्रक्रिया, व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणी, भांडवल उभारणीचे मार्ग, तसेच व्यवसायातील संधी याबद्दल सविस्तर माहिती दिली. व्यवसायाची निवड आपल्या परिसरातील कच्च्या मालाच्या उपलब्धतेनुसार व स्थानिक बाजारपेठेच्या मागणीनुसार करावी, असे त्यांनी सांगितले. जाफराबाद ही मिरचीची प्रसिद्ध बाजारपेठ असल्याने मिरची, तसेच शेतीआधारित प्रक्रिया उद्योगावर महिलांनी भर द्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला.

याचबरोबर अमृत संस्थेकडून व्यवसाय उभारणीसाठी आयोजित केले जाणारे विविध प्रशिक्षण कार्यक्रम, व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज परतावा योजना, तसेच इम्पोर्ट-एक्सपोर्ट योजनेची सविस्तर माहिती सहभागी महिलांना देण्यात आली. या योजनांचा लाभ घेऊन महिलांनी स्वतःचा व्यवसाय उभारावा व आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमाला महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमातून महिलांना उद्योजकतेकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरणा मिळाल्याची भावना सहभागी महिलांनी व्यक्त केली.

अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/

Publisher: Nitin Khekale News publisher name | Date: 19-12-2025 News publication date | Time: 12:00 AM News publication time | Views: 127 Number of times this news has been viewed | District: jalna Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words