लातूरचे नवनिर्वाचित नगरसेवक प्रवीण कस्तुरे यांचा अमृत संस्थेतर्फे सत्कार

त्यांच्या सामाजिक कार्याला देण्यात आल्या शुभेच्छा

लातूरचे नवनिर्वाचित नगरसेवक प्रवीण कस्तुरे यांचा अमृत संस्थेतर्फे सत्कार मुख्य फोटो
लातूरचे नवनिर्वाचित नगरसेवक प्रवीण कस्तुरे यांचा अमृत संस्थेतर्फे सत्कार अतिरिक्त फोटो

लातूर : अलीकडेच झालेल्या लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आलेले प्रवीण कस्तुरे यांचा महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. त्या वेळी त्यांना अमृत संस्थेची दिनदर्शिका देण्यात आली. या वेळी प्रवीण कस्तुरे यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्या समाजकार्याला यश लाभावे, तसेच त्यांच्या कार्यातून शहराच्या विकासाला गती मिळावी, अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली.

अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील नागरिकांसाठी अधिकाधिक उपक्रम, प्रशिक्षण कार्यक्रम व विकासात्मक योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी या वेळी झालेल्या संवादात दिली. लातूर शहर व परिसरातील गरजू, दुर्लक्षित व वंचित घटकांपर्यंत शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी अमृत संस्थेसोबत समन्वयाने काम करण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून संशोधन, प्रशिक्षण, कौशल्यविकास व सामाजिक सक्षमीकरण या क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे. शासनाच्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करून लक्ष्यित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे.

या कार्यक्रमाला अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक शुभम मुळजकर, ट्रेनर आंबेकर सर, श्यामसुंदर सर, सूर्यासिंग राजपूत, संतोष पांचाळ, हृषीकेश कुलकर्णी, अमृतसखी कमलाक्षी कुलकर्णी आदी उपस्थित होते.

अधिक माहितीसाठी संपर्क :

शुभम मुळजकर - 7391065470

लातूर जिल्हा व्यवस्थापक, अमृत

कार्यालयाचा पत्ता :

अमृत संस्थेचे लातूर जिल्हा कार्यालय,

पहिला मजला, पितृछाया बिल्डिंग,

मयुरेश्वर अपार्टमेंट, सिग्नल कॅम्प,

विद्यानगर, लातूर - ४१३५१२ 

७३९१०६५४७०

अमृत संस्थेविषयी :

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.

https://mahaamrut.org.in/


Publisher: शुभम सुहासराव मुळजकर News publisher name | Date: 13-03-2026 News publication date | Time: 09:48 PM News publication time | Views: 228 Number of times this news has been viewed | District: latur Related district of the news
Publisher: शुभम सुहासराव मुळजकर News publisher name | Date: 13-03-2026 News publication date | Time: 09:48 PM News publication time | Views: 228 Number of times this news has been viewed | District: latur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 1 Comments

A
Amol m Kulkarni
14-03-2026 09:05 PM

Amrut is great work

Write a Comment
0 / 50 words