खरेदी, खवय्येगिरी आणि मौजमजेसाठीचे भव्य प्रदर्शन; सिंहगड रोडवर आयोजन
पुणे : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे अमृतपेठ थेट बाजारपेठ हा उपक्रम राबवला जातो. स्थानिक उद्योजकांना चांगली बाजारपेठ मिळावी आणि नागरिकांना दर्जेदार स्वदेशी उत्पादने थेट उत्पादकांकडून खरेदी करता यावीत, असा त्यामागचा उद्देश आहे. पुढच्या आठवड्यात गुढीपाडवा आहे. त्या पार्श्वभूमीवर, पुण्यात सिंहगड रोड परिसरात १४ मार्चला अमृतपेठ थेट बाजारपेठ भरवली जाणार आहे. अमृत संस्थेने आयोजित केलेले हे संस्कृती व्यावसायिक प्रदर्शन म्हणजेच शॉपिंग आणि फन एक्झिबिशन म्हणजे लघुउद्योजकांसाठी आपली उत्पादने सादर करण्याचे एक उत्कृष्ट व्यासपीठ ठरणार आहे.
या प्रदर्शनात विविध प्रकारच्या वस्तू व खाद्यपदार्थांची रेलचेल असेल. कपडे, घरगुती पदार्थ, कलात्मक वस्तू, ज्वेलरी, लहान मुलांच्या वस्तू, तसेच स्वादिष्ट खाद्यपदार्थ अशा अनेक उत्पादनांचे स्टॉल्स या प्रदर्शनात असतील. विशेष म्हणजे, मुलांना मिकी माउससोबत मजा करण्याची व फोटो काढण्याची संधी मिळणार असून, टॅटू काढण्यासह चमचमीत व स्वादिष्ट पदार्थांची मेजवानीही उपलब्ध असणार आहे. त्यामुळे हे प्रदर्शन म्हणजे संपूर्ण कुटुंबासाठी खरेदीसोबतच मनोरंजनाचीही पर्वणी ठरणार आहे.
स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देणे, स्थानिक उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि नागरिकांना दर्जेदार व विश्वासार्ह उत्पादने मिळवून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे नागरिकांनी कुटुंबासह या प्रदर्शनाला भेट देऊन लघुउद्योजकांना प्रोत्साहन द्यावे व खरेदीचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
अमृतपेठ थेट बाजारपेठ :
दिवस आणि वेळ : १४ मार्च २०२६ रोजी संध्याकाळी चार ते रात्री १० वाजेपर्यंत
स्थळ : अमृतगंगा सोसायटी, गोयलगंगा, सिंहगड रोड, पुणे
अधिक माहितीसाठी संपर्क : ९११२२२८७६७
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment