दर्जेदार स्थानिक उत्पादनांच्या खरेदीची संधी; रोबॉटिक्सच्या स्टॉलचे विशेष आकर्षण
छत्रपती संभाजीनगर : स्थानिक उद्योजकांना चांगली बाजारपेठ मिळावी आणि नागरिकांना दर्जेदार स्वदेशी उत्पादने थेट उत्पादकांकडून खरेदी करता यावीत, या उद्देशाने महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे ‘अमृतपेठ – थेट बाजारपेठ’ हा विशेष उपक्रम राबवला जातो. येत्या १४ व १५ मार्च रोजी छत्रपती संभाजीनगर येथे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. ठिकाणाची माहिती बातमीच्या शेवटी दिली आहे.
राज्यातील विविध शहरांमध्ये अमृतपेठ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, आता छत्रपती संभाजीनगरमध्येही हा उपक्रम मोठ्या उत्साहात होणार आहे. या बाजारपेठेत एकूण ५० स्टॉल्स असतील आणि त्यापैकी ३०पेक्षा अधिक स्टॉल्स महिला उद्योजकांचे असतील. या माध्यमातून महिलांनी तयार केलेली विविध दर्जेदार उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचणार आहेत.
अमृतपेठेमध्ये नागरिकांना वैविध्यपूर्ण घरगुती व स्वदेशी उत्पादने पाहायला मिळणार आहेत. यामध्ये मोत्याची महिरप, फूल समई महिरप, लोकरीचे रुखवत, सजावटीच्या वस्तू, विविध मसाले, बीटरूट पावडर, देशी गायीचे तूप, लाकडी घाण्याचे तेल, फ्लोअर क्लीनर, इमिटेशन ज्वेलरी, कपडे, तसेच अनेक प्रकारच्या हस्तकला वस्तू, खाद्यपदार्थ आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंचा समावेश असणार आहे. त्यामुळे कुटुंबासह भेट देणाऱ्या नागरिकांना एकाच ठिकाणी विविध वस्तू खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
या बाजारपेठेचे आणखी एक खास आकर्षण म्हणजे या ठिकाणी 'रोबोटा क्लासरूम अँड सोल्युशन'चा स्टॉल असणार आहे. या स्टॉलमधून विद्यार्थी व नागरिकांना रोबॉटिक्स तंत्रज्ञानाची माहिती, मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिके पाहण्याची संधी मिळणार आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाची आवड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा स्टॉल विशेष आकर्षण ठरणार आहे.
स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देणे, स्थानिक उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि नागरिकांना दर्जेदार व विश्वासार्ह उत्पादने मिळवून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे नागरिकांनी कुटुंबासह या दोन दिवसांच्या बाजारपेठेला भेट देऊन स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अमृतपेठ – थेट बाजारपेठ २०२६
दिनांक : १४ व १५ मार्च २०२६
वेळ : सकाळी ९.०० ते रात्री ९.००
स्थळ : शिवम मंगल कार्यालय, छप्पन भोग हॉटेलच्या पाठीमागे,
छत्रपती नगर, देवळाई चौक, बीड बायपास, छत्रपती संभाजीनगर
अधिक माहितीसाठी संपर्क :
अक्षय चंद्रकांत लंबे - 7391065475
छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक
योगेश भास्कर रोडे - 9403200606
जिल्हा उपव्यवस्थापक
रामेश्वर साळुंके - 8010095930
अमृतमित्र
मंजू कुलकर्णी - 9404593726
अमृतसखी
ऋचा शर्मा - 7709080073
अमृतसखी
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment