अमृतपेठ थेट बाजारपेठ उपक्रम १५ मार्च रोजी कोल्हापूरमध्ये

इन्स्टंट कोल्हापुरी मिसळीसह विविध दर्जेदार स्थानिक उत्पादनांच्या खरेदीची संधी; स्टॉल बुकिंगची मुदत १४ मार्चपर्यंतच

अमृतपेठ थेट बाजारपेठ उपक्रम १५ मार्च रोजी कोल्हापूरमध्ये मुख्य फोटो
मुख्य फोटो

कोल्हापूर : स्थानिक उत्पादकांच्या दर्जेदार उत्पादनांच्या विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाची स्वायत्त संस्थेतर्फे 'अमृतपेठ - थेट बाजारपेठ' हा विशेष उपक्रम राबवला जातो. आतापर्यंत राज्यातील विविध शहरांमध्ये या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला असून, आता हा उपक्रम कोल्हापूर शहरात राबवला जाणार आहे. १५ मार्च रोजी दिवसभर या उपक्रमाचा लाभ कोल्हापूरकरांना घेता येणार आहे.

कोल्हापूरमधील अमृतपेठ थेट बाजारपेठेत एकूण २५ स्टॉल्स असतील आणि त्यापैकी १०हून अधिक स्टॉल्स महिला उद्योजकांचे असतील. या ठिकाणी ग्राहकांना विविध प्रकारची स्वदेशी व घरगुती उत्पादने थेट उत्पादकांकडून खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये सोलकढी पावडर, इन्स्टंट कोल्हापुरी मिसळ, बीटरूट पावडर, देशी गायीचे तूप, गूळ, लाकडी घाण्याचे तेल, फ्लोअर क्लीनर, इमिटेशन ज्वेलरी, कपडे, तसेच इतर अनेक उपयुक्त वस्तूंचे स्टॉल्स असतील.

विशेष म्हणजे या बाजारपेठेमध्ये इन्स्टंट कोल्हापुरी मिसळदेखील उपलब्ध असेल. ही मिसळ अस्सल कोल्हापुरी चवीची असून, घरच्या घरी काही मिनिटांत झटपट तयार करता येते. कोल्हापूरच्या या प्रसिद्ध इन्स्टंट मिसळीची चव घेण्याची संधी ग्राहकांना या बाजारपेठेत मिळणार आहे.

स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देणे, स्थानिक उद्योजकांना उत्पादनांच्या विक्रीसाठी व्यासपीठ आणि ग्राहकांना दर्जेदार उत्पादने उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. इच्छुक उद्योजकांनी लवकरात लवकर स्टॉल बुकिंग करावे, असे आवाहन अमृत संस्थेचे कोल्हापूर जिल्हा व्यवस्थापक प्रशांत जोशी यांनी केले आहे.

अमृतपेठ बाजारपेठेविषयी :

दिवस आणि वेळ : १५ मार्च २०२६ रोजी सकाळी १० ते रात्री नऊ

ठिकाण : ब्राह्मण सभा करवीर, मंगलधाम, १६७ बी वॉर्ड, 

मंगळवार पेठ, बिनखांबी गणेश मंदिराजवळ, कोल्हापूर

बुकिंगसाठी संपर्क : 9112228764 / 9518900996

बुकिंगची अंतिम तारीख : १४ मार्च २०२६


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Prashant Joshi News publisher name | Date: 11-03-2026 News publication date | Time: 03:19 PM News publication time | Views: 74 Number of times this news has been viewed | District: kolhapur Related district of the news
Publisher: Prashant Joshi News publisher name | Date: 11-03-2026 News publication date | Time: 03:19 PM News publication time | Views: 74 Number of times this news has been viewed | District: kolhapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words