अमरावतीत अमृतपेठ थेट बाजारपेठेमुळे लघुउद्योजक आणि ग्राहकांमध्ये तयार झाला सेतू

स्थानिक उद्योजकांना संधी; ग्राहकांना स्वस्त आणि दर्जेदार वस्तू!

अमरावतीत अमृतपेठ थेट बाजारपेठेमुळे लघुउद्योजक आणि ग्राहकांमध्ये तयार झाला सेतू मुख्य फोटो
अमरावतीत अमृतपेठ थेट बाजारपेठेमुळे लघुउद्योजक आणि ग्राहकांमध्ये तयार झाला सेतू अतिरिक्त फोटो

अमरावती : कोणत्याही उद्योगाच्या यशस्वितेसाठी आवश्यकता असते ती उत्तम बाजारपेठेची म्हणजेच ग्राहकांची. लघुउद्योजक आणि ग्राहकांमध्ये उत्तम सेतू तयार व्हावा, या उद्देशाने अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेने अमरावतीमध्ये 'अमृतपेठ थेट बाजारपेठ' हा उपक्रम राबवला होता. सहा ते आठ मार्च या कालावधीत जाधव पॅलेसमध्ये भरलेल्या या भव्य प्रदर्शनाला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. त्यामुळे स्थानिक उद्योजकांना आपली उत्पादने अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली आणि ग्राहकांना दर्जेदार, स्वदेशी उत्पादने उपलब्ध झाली.

तीन दिवसांच्या या अमृतपेठ थेट बाजारपेठेमध्ये अमृत संस्थेच्या योजनेचा लाभ घेतलेल्या विविध लघुउद्योजकांनी आपले स्टॉल लावले होते. विशेषतः ब्राह्मण, मारवाडी, गुजराती, सिंधी समाजातील अनेक उद्योजकांचा आणि त्यांच्या हँडमेड व स्वदेशी उत्पादनांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता.

या प्रदर्शनाला अमरावती शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट दिली. नागरिकांनी विविध प्रकारच्या वस्तूंची खरेदी करून स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन दिले. यामुळे अनेक उद्योजकांना स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ मिळाले. अमृतपेठ उपक्रमामुळे उद्योजकांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली. तसेच नागरिकांना स्वस्त दरात आणि दर्जेदार, स्थानिक उत्पादने खरेदी करण्याची सुविधा मिळाली. त्यामुळे या प्रदर्शनामुळे उद्योजक आणि ग्राहक यांच्यात सेतू तयार झाला.

या अमृतपेठ प्रदर्शनाला अनेक मान्यवरांनीही भेट दिली. यामध्ये अमरावतीचे महापौर, तसेच अनेक नगरसेवक, माजी नगरसेवक, समाजसेवक, सरकारी अधिकारी, तसेच खासगी क्षेत्रातील विविध संस्था आणि इंजिनीअर असोसिएशनचे प्रतिनिधी यांचा त्यात समावेश होता. या सर्व मान्यवरांनी स्टॉलना भेट देऊन उद्योजकांच्या उत्पादनांची पाहणी केली. तसेच काही वस्तूंची खरेदी करून स्थानिक उद्योजकांना पाठबळ दिले.

अमृतपेठ - थेट बाजारपेठ या उपक्रमामुळे अनेक उद्योजकांना नवे ग्राहक मिळाले आणि त्यांच्या व्यवसायाला चांगली सुरुवात झाली. नागरिकांच्या मोठ्या प्रतिसादामुळे हे प्रदर्शन यशस्वीरीत्या पार पडले असून, भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम राबवून उद्योजकतेला मोठे बळ दिले जाणार आहे.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/



Publisher: RUSHIKESH KATHALAKR News publisher name | Date: 09-03-2026 News publication date | Time: 02:52 PM News publication time | Views: 94 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news
Publisher: RUSHIKESH KATHALAKR News publisher name | Date: 09-03-2026 News publication date | Time: 02:52 PM News publication time | Views: 94 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words