सांगली जिल्ह्यातील अमणापूरमध्ये १८ डिसेंबरला अमृत मेळावा

सांगली : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेली अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था आणि कृष्णाबाई मंदिर नदी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी, १८ डिसेंबर २०२५ रोजी सांगली जिल्ह्यातील अमणापूर येथे अमृत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

फोटो उपलब्ध नाहीत

या बातमीशी संबंधित कोणतेही फोटो उपलब्ध नाहीत

सांगली : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेली अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था आणि कृष्णाबाई मंदिर नदी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी, १८ डिसेंबर २०२५ रोजी सांगली जिल्ह्यातील अमणापूर येथे अमृत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधील कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

कुटुंबातील प्रत्येक घटकासाठी म्हणजे विद्यार्थी, तरुण, महिला, पुरुष, उद्योजक, शेतकरी, पुरोहित अशा सर्वांसाठी अमृत संस्था वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून काम करते. या योजनांची माहिती लक्ष्यित घटकांना व्हावी यासाठी अमृत मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला अमृत संस्थेचे सांगली जिल्हा व्यवस्थापक शैलेंद्र जहागीरदार व अमृत मित्र अभिजित कुलकर्णी उपस्थित राहून योजनांची माहिती देऊन मार्गदर्शन करणार आहेत. तसेच आपल्या मनातील प्रश्न व शंका नागरिकांना विचारता येणार असून थेट संवाद साधता येणार आहे. अशा प्रकारचा कार्यक्रम तालुक्यात प्रथमच होत असून, ही एक सुवर्णसंधी आहे. तरी कार्यक्रमाला उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा व आपल्यासह समाजाचा उत्कर्ष साधावा असे आवाहन कृष्णाबाई मंदिर नदी संस्थेचे अध्यक्ष गजाभाऊ कुलकर्णी यांनी केले आहे.

दिवस : गुरुवार, दि. १८/१२/२०२५
वेळ : सायंकाळी साडेपाच वाजता
स्थळ : कृष्णाबाई मंदिर, अमणापूर, ता. पलूस, जि. सांगली

Publisher: Shailendra Jahagirdar News publisher name | Date: 17-12-2025 News publication date | Time: 12:00 AM News publication time | Views: 50 Number of times this news has been viewed | District: sangli Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words