ठाणे जिल्ह्यातील प्रशिक्षण कार्यक्रमाची प्रमाणपत्र वितरणाने सांगता
कल्याण (ठाणे) : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या बेकरी प्रशिक्षण कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. हे प्रशिक्षण कौशल्यविकास, आत्मनिर्भरता आणि आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने अत्यंत फायद्याचे ठरले, अशी प्रातिनिधिक भावना प्रशिक्षणार्थ्यांकडून व्यक्त झाली. कल्याणमधील अचीव्हर्स कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आलेले बेकरी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण करण्याचा सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. मान्यवरांच्या हस्ते ही प्रमाणपत्रे देण्यात आली. या वेळी प्रशिक्षणार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
बेकरी उत्पादनांच्या विविध प्रकारांचे प्रशिक्षण या उपक्रमात देण्यात आले होते. कार्यक्रमात मान्यवरांनी प्रशिक्षणार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या. या उपक्रमामुळे सहभागी महिला व युवकांना स्वावलंबनाच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. कोकण विभागीय व्यवस्थापक अमित सामंत यांनी हा वर्ग यशस्वी होण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. मान्यवरांनी समारोप कार्यक्रमात स्वयंरोजगार, तसेच अमृत आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) या दोन्ही संस्थांतर्फे चालवल्या जाणाऱ्या संयुक्त कोर्सेसची माहिती दिली.
पुढील बॅचमध्ये नोंदणीसाठी संपर्क :
माया रत्नपारखी-खेत्रे 81083 83871
ठाणे जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment