परतवाड्यात अमृत संस्थेच्या योजनांविषयी जनजागृती

विशेष बैठकीमध्ये अधिकाऱ्यांनी केले मार्गदर्शन

परतवाड्यात अमृत संस्थेच्या योजनांविषयी जनजागृती मुख्य फोटो
परतवाड्यात अमृत संस्थेच्या योजनांविषयी जनजागृती अतिरिक्त फोटो

परतवाडा (अमरावती) : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या योजनांची माहिती देण्यासाठी अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर तालुक्यातील परतवाडा येथे एक छोटी बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली. अमृत संस्थेचे विविध उपक्रम आणि योजनांची सविस्तर माहिती या वेळी देण्यात आली.

बैठकीमध्ये उपस्थितांना अमृतच्या विविध योजनांबरोबरच अमृतपेठ, तसेच अमृत बाजारपेठ यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिक, युवक-युवती आणि उद्योजकांनी घ्यावा, यासाठी आवश्यक ती माहिती देण्यात आली. या बैठकीत अमृत संस्थेचे विभागीय व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर यांनी उपस्थितांना योजनांची सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले. जिल्हा व्यवस्थापक ऋषीकेश कथलकर यांनी उपस्थितांना योजनांचा लाभ कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन केले.

या बैठकीला स्थानिक नागरिक व इच्छुक लाभार्थी उपस्थित होते. उपस्थितांनी योजनांविषयी माहिती जाणून घेतली व पुढील उपक्रमांबाबत उत्सुकता दर्शवली.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: केदार दीपक गोगरकर News publisher name | Date: 02-03-2026 News publication date | Time: 10:40 AM News publication time | Views: 38 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news
Publisher: केदार दीपक गोगरकर News publisher name | Date: 02-03-2026 News publication date | Time: 10:40 AM News publication time | Views: 38 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words