'अमृत'च्या कार्यपद्धतीची प्रशंसा
नाशिक : सध्या नाशिकमध्ये सुरू असलेल्या चौथ्या विश्व मराठी संमेलनात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचेही दालन आहे. अमृत संस्थेच्या या दालनाला मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी भेट दिली. त्यांनी अमृत संस्थेच्या विविध योजनांची माहिती घेतली. विविध योजना आणि अमृत संस्थेच्या एकंदर कार्यपद्धतीचे कौतुक केले. त्यांच्या या भेटीवेळी मराठी भाषा संचालनालयाचे सहसचिव डॉ. नामदेव भोसले, मराठी भाषा विभागाच्या उपसंचालिका अंजली ढमाळ आदी मान्यवरही उपस्थित होते.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment