प्रशिक्षणापुरते न थांबता महिलांनी व्यवसाय उभारावा : अमृत संस्थेचे राज्य व्यवस्थापक दीपक जोशी

माजलगावमध्ये अमृत आरीवर्क प्रशिक्षणाचा प्रारंभ

प्रशिक्षणापुरते न थांबता महिलांनी व्यवसाय उभारावा : अमृत संस्थेचे राज्य व्यवस्थापक दीपक जोशी मुख्य फोटो
प्रशिक्षणापुरते न थांबता महिलांनी व्यवसाय उभारावा : अमृत संस्थेचे राज्य व्यवस्थापक दीपक जोशी अतिरिक्त फोटो

माजलगाव (जि. बीड) : 'महिलांनी केवळ प्रशिक्षण घेऊन थांबू नये, तर आत्मविश्वासाने स्वतःचा व्यवसाय उभारून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे. अमृत संस्था प्रत्येक टप्प्यावर त्यांच्यासोबत ठामपणे उभी राहील,' असे प्रतिपादन अमृत संस्थेचे राज्य व्यवस्थापक दीपक जोशी यांनी केले. अमृत संस्थेतर्फे माजलगाव येथे सुरू झालेल्या अमृत आरीवर्क प्रशिक्षणवर्गाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीपूजनाने करण्यात आली. या वेळी कौशल्य विकास विभागाचे योगेश जोशी, सामाजिक कार्यकर्त्या शुभांगी आनंदगावकर, 'रुद्रवार कम्प्युटर'च्या संचालिका पूजा रुद्रवार, अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक विशाल जोशी, जिल्हा उपव्यवस्थापक दिगंबर जोशी, जालना जिल्हा उपव्यवस्थापक चिंतेश जोशी, माजलगाव अमृत समन्वयक सुमित धिरडे, तसेच आरीवर्क प्रशिक्षिका वैष्णवी होके उपस्थित होत्या.

या वेळी दीपक जोशी म्हणाले, की 'महिला आपल्या व्यग्र दिनचर्येतून वेळ काढून प्रशिक्षणासाठी येत आहेत. पूर्ण शिस्त, सातत्य आणि तन्मयतेने प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. नियमित उपस्थिती हीच यशाची गुरुकिल्ली आहे. कोणीही गैरहजर राहू नये. तसेच आपल्या माध्यमातून अधिकाधिक महिलांपर्यंत अमृत संस्थेच्या विविध योजनांची माहिती पोहोचवावी.'

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन बीड जिल्हा व्यवस्थापक विशाल जोशी यांनी केले. त्यांनी अमृत संस्थेच्या विविध योजनांची माहिती देऊन महिलांनी या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

मनोगत व्यक्त करताना शुभांगी आनंदगावकर व पूजा रुद्रवार यांनी प्रशिक्षणार्थी महिलांचा उत्साह वाढवून स्वावलंबनाचा संदेश दिला आणि उपक्रमाचे कौतुक केले. आरीवर्क प्रशिक्षिका वैष्णवी होके यांनी शिकवण्यात येणाऱ्या कौशल्यांची माहिती देऊन हे प्रशिक्षण पूर्णतः व्यवसायाभिमुख असल्याचे स्पष्ट केले. दिगंबर जोशी यांनी आभारप्रदर्शन केले. प्रशिक्षण सुरू करण्यासाठी समन्वयक सुमित धिरडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

अमृत संस्था विविध कौशल्यविषयक प्रशिक्षण कार्यक्रम नियमितपणे राबवत असून, इच्छुकांनी जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधून पुढील प्रशिक्षणवर्गासाठी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक विशाल जोशी यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : 73910 65468

पत्ता : अमृत संस्थेचे बीड जिल्हा कार्यालय,

अथर्व कॉम्प्लेक्स, नवगण कॉलेज रोड, 

वाघ नेत्रालयाशेजारी, बीड

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Vishal Joshi News publisher name | Date: 28-02-2026 News publication date | Time: 03:18 PM News publication time | Views: 102 Number of times this news has been viewed | District: beed Related district of the news
Publisher: Vishal Joshi News publisher name | Date: 28-02-2026 News publication date | Time: 03:18 PM News publication time | Views: 102 Number of times this news has been viewed | District: beed Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words