‘अमृत’च्या योजनाप्रसारासाठी सहकार्य करू; अहिल्यानगरमध्ये महिला नेत्यांनी व्यक्त केला मानस

अहिल्यानगर : अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या अहिल्यानगर जिल्हा कार्यालयाला भारतीय जनता पक्षाच्या अहिल्यानगर महिला जिल्हाध्यक्ष सौ. प्रियाताई जानवे आणि राजपूत समाजाच्या राष्ट्रीय चिटणीस सौ. छायाताई राजपूत यांनी सदिच्छा भेट दिली.

फोटो उपलब्ध नाहीत

या बातमीशी संबंधित कोणतेही फोटो उपलब्ध नाहीत

अहिल्यानगर : अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या अहिल्यानगर जिल्हा कार्यालयाला भारतीय जनता पक्षाच्या अहिल्यानगर महिला जिल्हाध्यक्ष सौ. प्रियाताई जानवे आणि राजपूत समाजाच्या राष्ट्रीय चिटणीस सौ. छायाताई राजपूत यांनी सदिच्छा भेट दिली. अमृत संस्थेचे अहिल्यानगर जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी त्यांना अमृत संस्थेच्या योजनांची सविस्तर माहिती दिली. त्यांचा यथोचित सन्मानही केला. अमृत संस्थेच्या योजना लक्ष्यित गटापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच अमृत कौशल्य योजनेअंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त करून दाखवला. या वेळी ‘एमसीईडी’चे प्रकल्प अधिकारी रमेश जाधव हेदेखील उपस्थित होते.

अमृत संस्थेविषयी :

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/

Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 11-12-2025 News publication date | Time: 12:00 AM News publication time | Views: 42 Number of times this news has been viewed | District: ahilyanagar Related district of the news
Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 11-12-2025 News publication date | Time: 12:00 AM News publication time | Views: 42 Number of times this news has been viewed | District: ahilyanagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words