सावरकरांच्या कार्याचे करण्यात आले स्मरण
लातूर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या लातूर जिल्हा कार्यालयात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना स्मृतिदिनानिमित्त वंदन करण्यात आले. त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रखर राष्ट्रभक्त, साहित्यिक आणि समाजसुधारक स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी विश्व हिंदू परिषदेचे प्रांत नैतिक शिक्षा प्रमुख संतोष कुलकर्णी, मंगेश पाठक, अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक शुभम मुळजकर, उपव्यवस्थापक विनोद अपसिंगेकर, अमृतसखी कमलाक्षी कुलकर्णी आदी उपस्थित होते.
या वेळी विश्व हिंदू परिषदेचे नैतिक शिक्षा विभागप्रमुख संतोष कुलकर्णी आणि ज्योतिषी मंगेश पाठक यांनी कार्यालयाला भेट दिल्याबद्दल त्यांचा स्वागतपर सत्कार करण्यात आला. अमृत संस्थेच्या कार्याची त्यांना माहिती देण्यात आली. तसेच, अमृतपेठ विषयासंदर्भात चर्चा करण्यात आली.
अधिक माहितीसाठी संपर्क :
शुभम मुळजकर - 7391065470
लातूर जिल्हा व्यवस्थापक, अमृत
अमृत कार्यालयाचा पत्ता :
पहिला मजला, पितृछाया बिल्डिंग, मयुरेश्वर अपार्टमेंट,
सिग्नल कॅम्प, विद्यानगर,
ता. जि. लातूर - 413512
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment