नाशिकच्या विश्व मराठी संमेलनात अमृत संस्थेचेही दालन

संस्थेच्या योजना, प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचणार

नाशिकच्या विश्व मराठी संमेलनात अमृत संस्थेचेही दालन मुख्य फोटो
मुख्य फोटो

नाशिक : राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाने आयोजित केलेल्या चौथ्या विश्व मराठी संमेलनाला २६ फेब्रुवारीपासून नाशिकमध्ये सुरुवात झाली आहे. एक मार्चपर्यंत चालणार असलेल्या या संमेलनात महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या दालनाचाही समावेश आहे. 

राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाने आयोजित केलेले हे संमेलन नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या के. टी. एच. एम. महाविद्यालयाच्या परिसरात भरले आहे. संमेलनस्थळी अनेक दालनांचे उद्घाटन झाले असून, आठ आणि नऊ क्रमांकाची दालने अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेची आहेत. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी विविध प्रकारच्या योजना राबवते. तसेच, लक्ष्यित गटातील उमेदवारांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी, उद्योजकता विकासाकरिता प्रशिक्षण कार्यक्रमही राबवते. संस्थेचे कार्यक्षेत्र, कौशल्य विकास, कर्ज व्याज परतावा यांसारख्या विविध योजना, प्रशिक्षण कार्यक्रम, लाभार्थ्यांच्या यशोगाथा या साऱ्याची सविस्तर माहिती संस्थेच्या संमेलनातील दालनामध्ये देण्यात येत आहे. अमृत संस्थेचे नाशिक जिल्हा व्यवस्थापक, तसेच अमृतमित्र आणि अमृतसखी या दालनामध्ये उपस्थित आहेत. अमृत संस्थेच्या या दालनाला जास्तीत जास्त जणांनी भेट द्यावी आणि विविध योजनांची माहिती करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 26-02-2026 News publication date | Time: 04:04 PM News publication time | Views: 80 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 26-02-2026 News publication date | Time: 04:04 PM News publication time | Views: 80 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 1 Comments

V
Vijay Joshi
28-02-2026 10:03 AM

विश्व मराठी संमेलन नाशिक येथे विविध उपलब्ध दलनामध्ये अमृत या संस्थेच्या दालनाला विशेष महत्त्व मिळाल्याचे दिसते.
अमृतचे हार्दिक अभिनंदन

Write a Comment
0 / 50 words