महिन्याभराच्या कार्यक्रमातून प्रशिक्षणार्थ्यांना मिळणार उद्योजकीय कौशल्ये
चंद्रपूर : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारपूर तालुक्यात बेकरी उद्योगाचे प्रशिक्षण देणारा ३० दिवसांचा मोफत वर्ग सुरू झाला आहे. २४ फेब्रुवारीला त्याचे उद्घाटन झाले. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या (एमसीईडी) सहकार्याने या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला अमृत संस्थेचे नागपूर विभागीय उपव्यवस्थापक विक्रम मोहन पांडे, चंद्रपूर जिल्हा उपव्यवस्थापक आदित्य सेंगर, चंद्रपूर तालुक्याचे अमृतमित्र श्रीरंग खोंड, बल्लारपूर तालुक्याचे अमृतमित्र सतीश नारायणदास व 'एमसीईडी'चे जिल्हा समन्वयक संदीप जाणे उपस्थित होते. या वेळी आदित्य सेंगर यांनी अमृत संस्थेच्या सर्व योजनांची सविस्तर माहिती देऊन व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या गोष्टी प्रशिक्षणार्थ्यांना सांगितल्या. या प्रशिक्षणामुळे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आत्मविश्वास मिळत असून, रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.
स्वतःचा व्यवसाय कसा सुरू करायचा, उद्योजकीय कौशल्ये कशी मिळवायची, ग्राहक कसे वाढवायचे, बाजारपेठेचे नियोजन कसे करायचे अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर या प्रशिक्षण कार्यक्रमात सविस्तर मार्गदर्शन केले जात आहे. तसेच अमृत संस्थेच्या विविध योजना, कर्जविषयक माहिती आणि इतर शासकीय योजनांची माहितीही प्रशिक्षणार्थ्यांना दिली जात आहे. या कार्यक्रमात वैष्णवी मिरगाणी प्रशिक्षण देत आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क :
विक्रम मोहन पांडे - 9112228774
चंद्रपूर जिल्हा व्यवस्थापक, अमृत
पत्ता : गुरुद्वारा रोड, कृष्णा टॉवरजवळ,
तुकूम, चंद्रपूर - 442402
ई-मेल : amrut.chandrapur.dm@mail.com
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment