सहा ते आठ मार्च या कालावधीत आयोजन
अमरावती : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे लक्ष्यित गटातून उद्योजक घडवण्यासाठी आणि त्या उद्योजकांना सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. त्याअंतर्गत अमरावतीमध्ये सहा ते आठ मार्च या कालावधीत अमृतपेठ प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. या भव्य प्रदर्शनामध्ये विविध प्रकारची व्यावसायिक उत्पादने ग्राहकांना पाहता आणि खरेदी करता येणार आहेत. त्यामध्ये नैसर्गिक सौंदर्य उत्पादनांचाही समावेश असेल. स्वतः कॉस्मेटिक्स तयार करणाऱ्या प्रोफेशनल एक्स्पर्ट गुंजन शर्मा या प्रदर्शनामध्ये सहभागी होणार असून, त्यांची दर्जेदार उत्पादने ग्राहकांना उपलब्ध असतील.
त्या गेल्या अनेक वर्षांपासून त्वचा, केस आणि आरोग्याकरिता सुरक्षित व परिणामकारक अशी कॉस्मेटिक उत्पादने तयार करत आहेत. त्यांच्या उत्पादनांना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, अनेकांनी त्या उत्पादनांचा वापर करून चांगला परिणाम अनुभवला आहे. विशेष म्हणजे त्या ग्राहकांना त्यांच्या त्वचेच्या प्रकारानुसार मार्गदर्शनही करतात. त्यामुळे त्यांच्या स्टॉलला भेट देणाऱ्यांना योग्य सल्ला आणि दर्जेदार उत्पादने एकाच ठिकाणी मिळणार आहेत.
रसायनयुक्त उत्पादनांमुळे आजच्या काळात त्वचा आणि केसांच्या समस्या वाढताना दिसतात. अशा परिस्थितीत नैसर्गिक पद्धतीने तयार केलेली उत्पादने ग्राहकांसाठी उपयुक्त ठरत आहेत. त्यामुळे गुंजन शर्मा यांच्या स्टॉलला भेट देण्यासाठी महिलांसह तरुणींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. सौंदर्य आणि आरोग्याची काळजी घेणाऱ्यांसाठी हे प्रदर्शन अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
सहा ते आठ मार्च २०२६ या कालावधीत अमरावतीतील बडनेरा रोडवरील जाधव पॅलेसमध्ये हे प्रदर्शन भरणार आहे. त्या वेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9527317068, 7249451152
पत्ता : अमृत विभागीय कार्यालय,
घर क्रमांक 33, आशीर्वाद बिल्डिंग,
विदर्भ हाउसिंग कॉलनी,
मालटेकडीसमोर, बस स्टँड रोड,
अमरावती - 444602
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 1 Comments
Anand Oak
मॅडम अमृत मला कमी वेळ मध्ये उच्च दर्जाच्या मालाची निर्मिती करण्यात शिकविले आहे. अमूर्त पेठ मार्फत 9 डिसेंबर 2025 माझ्या नवीन मसाला, आटा बेसनाचे मॅन्युफॅक्चरिंग आणि पॅकिंग यूनीट उदघाटन केले आणि वेळोवेळी मार्गदर्शन केले. अमूर्त पेठ मार्फत नुकतेच 10 दिवसाचे अमूर्त कौशल उद्योग प्रशिक्षण दिले. माझी निवड करण्यात आली होती.
Write a Comment