धामणगाव रेल्वे येथे झाली अमृत संस्थेची बैठक

नागरिकांना मिळाली योजनांची थेट माहिती

धामणगाव रेल्वे येथे झाली अमृत संस्थेची बैठक मुख्य फोटो
धामणगाव रेल्वे येथे झाली अमृत संस्थेची बैठक अतिरिक्त फोटो

अमरावती : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या विविध योजना आणि उपक्रमांची माहिती देण्यासाठी धामणगाव रेल्वे येथे एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक केदार गोगरकर यांनी उपस्थित नागरिकांना अमृत संस्थेच्या विविध योजना, पात्रता निकष, अर्जप्रक्रिया, तसेच खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी उपलब्ध असलेल्या योजनांची सविस्तर माहिती दिली.

बैठकीत लाभार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. तसेच अधिकाधिक नागरिकांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक दीपक राठी यांनी केले. त्याचप्रमाणे लवकरच सुरू होणाऱ्या अमृत उद्योग कौशल्यवर्धन (ईडीपी) प्रशिक्षण कार्यक्रमााबद्दलही माहिती देण्यात आली. बैठकीला उपस्थितांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमामुळे धामणगाव रेल्वे परिसरातील नागरिकांना अमृत संस्थेच्या योजनांची थेट माहिती मिळाली. त्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.

अधिक माहितीसाठी संपर्क :

केदार गोगरकर - 9112227635

अमृत संस्थेविषयी :

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in


Publisher: केदार दीपक गोगरकर News publisher name | Date: 24-02-2026 News publication date | Time: 11:49 AM News publication time | Views: 60 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news
Publisher: केदार दीपक गोगरकर News publisher name | Date: 24-02-2026 News publication date | Time: 11:49 AM News publication time | Views: 60 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words