नागपूर : भारतीय जनता पक्षातर्फे दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील प्रतापनगर येथील कार्यालयात ११ डिसेंबर रोजी दिवसभर व्यवसाय व्यासपीठ आणि प्रदर्शन या भव्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या नागपूर जिल्हा कार्यालयाने लावलेला स्वतंत्र माहितीपर स्टॉल आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
नागपूर : भारतीय जनता पक्षातर्फे दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील प्रतापनगर येथील कार्यालयात ११ डिसेंबर रोजी दिवसभर व्यवसाय व्यासपीठ आणि प्रदर्शन या भव्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या नागपूर जिल्हा कार्यालयाने लावलेला स्वतंत्र माहितीपर स्टॉल आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. स्टॉलवर अमृतसखी दर्शना जाब्रस उपस्थित होत्या. त्यांनी नागरिकांना अमृत पेठ, कौशल्य विकास प्रशिक्षण योजना, महिला उद्योजकता उपक्रम आणि विविध लाभार्थी योजनांची सविस्तर माहिती दिली. अनेक तरुण, महिला उद्योजक आणि इच्छुक लाभार्थ्यांनी त्यांच्याकडून माहिती घेतली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. रोजगार, उद्योजकता आणि उद्योग गुणवृद्धीसाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती एका व्यासपीठावर उपलब्ध करून देणे हा त्याचा प्रमुख उद्देश होता. या प्रदर्शनात सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग, पीएमईजीपी, महाजाल सेवा, स्टार्टअप इंडिया, महिला समृद्धी योजना यांसारखे ४०हून अधिक विभाग सहभागी झाले होते. स्वावलंबन, कर्ज योजना, मदत योजना, कौशल्य विकास आणि रोजगार निर्मितीशी संबंधित योजनांची नागरिकांना प्रत्यक्ष माहिती मिळाली.
कार्यक्रमात अमृत संस्थेचे नागपूर जिल्हा व्यवस्थापक हर्षल गद्रे यांनी प्रदर्शनाच्या मुख्य आयोजिका सौ. श्रुती देशपांडे यांची भेट घेतली. त्यांनी स्टॉल प्रमुख व नागरिकांना अमृत संस्थेच्या सर्व उपक्रमांची माहिती देऊन संस्था समाजाच्या सक्षमतेसाठी कशाप्रकारे कार्यरत आहे याविषयी थोडक्यात मार्गदर्शन केले. स्थानिक महिला, तरुण उद्योजक, स्वयंसहाय्यता गट आणि रोजगाराच्या संधी शोधणाऱ्या नागरिकांसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला असून, आयोजक आणि सहभागी संस्थांकडून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment