कोल्हापूरमध्ये १८ डिसेंबरपासून निःशुल्क बेकरी प्रशिक्षण वर्ग; तुम्ही नावनोंदणी केलीत का?

कोल्हापूर : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेने महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या (एमसीईडी) संयुक्त विद्यमाने कोल्हापुरात बेकरी प्रशिक्षण वर्ग आयोजित केला आहे. १८ डिसेंबरपासून सुरू होणार असलेल्या या महिन्याभराच्या निःशुल्क निवासी प्रशिक्षण वर्गात बेकरी व्यवसायातील नामांकित संस्थेकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे.

फोटो उपलब्ध नाहीत

या बातमीशी संबंधित कोणतेही फोटो उपलब्ध नाहीत

कोल्हापूर : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेने महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या (एमसीईडी) संयुक्त विद्यमाने कोल्हापुरात बेकरी प्रशिक्षण वर्ग आयोजित केला आहे. १८ डिसेंबरपासून सुरू होणार असलेल्या या महिन्याभराच्या निःशुल्क निवासी प्रशिक्षण वर्गात बेकरी व्यवसायातील नामांकित संस्थेकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणांना, तसेच महिलांना उद्योगविश्वात पाऊल टाकून प्रगती करण्याच्या दृष्टीने ही सुवर्णसंधी आहे. १७ जानेवारी २०२६पर्यंत चालणार असलेल्या या प्रशिक्षण वर्गात मोजक्याच जागा शिल्लक आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील लक्ष्यित गटातील महिला आणि तरुणांनी लवकरात लवकर आपली नोंदणी करावी, असे आवाहन अमृत संस्थेचे कोल्हापूर जिल्हा व्यवस्थापक प्रशांत जोशी यांनी केले आहे. लक्ष्यित गटाने या संधीकडे आपल्याला उद्योजक होण्यासाठी मिळालेली अमृत संजीवनी समजून लाभ घ्यावा, असे आवाहन जोशी यांनी केले आहे.

कोण लाभ घेऊ शकते?

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था आहे. खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठलाही स्वतंत्र शासकीय विभाग, संस्था किंवा महामंडळामार्फत योजनांचा लाभ मिळत नाही, अशा खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (म्हणजे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असलेल्यांसाठी) अमृत ही संस्था विविध प्रकारच्या योजना राबवते. ब्राह्मण, मारवाडी, सिंधी, बनिया, राजपुरोहित, कम्मा, कायस्थ, ऐयागर, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, ठाकूर, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, कानबी, राजपूत, कोमटी अशा २२ जातींचा ‘अमृत’च्या लक्ष्यित गटात समावेश होतो. लक्ष्यित गटातील उद्योग करू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी ‘अमृत’तर्फे वेगवेगळ्या प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये बेकरी प्रशिक्षणाचाही समावेश आहे.

प्रशिक्षणात नेमके काय काय असणार?
तांत्रिक प्रशिक्षण : २४ दिवस

बेकरी उत्पादनांची व्याप्ती आणि महत्त्व
बेकरीमध्ये विविध व्यवसाय संधी
बेकरी उत्पादनांच्या उत्पादनासाठी विविध तंत्रे
विविध बेकरी उत्पादने तयार करण्यासाठी विशेष उपकरणे आणि साधने यांबाबत माहिती
केकचे प्रकार, टी-टाइम केकचे प्रकार, कुकीजचे प्रकार, पफ पेस्ट्रीजचे प्रकार,
ब्रेड, टोस्ट, पाव, पिझ्झा आणि बर्गर-बन, चॉकलेटचे प्रकार तयार करणे – थिअरी व प्रात्यक्षिक प्रशिक्षण
तयार मालाच्या गुणवत्तेचे मापदंड
अन्नसुरक्षा आणि वैयक्तिक स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी कामाच्या ठिकाणी आरोग्य आणि सुरक्षा पद्धती
FSSAI परवाना आणि उद्यम नोंदणीसाठी अर्ज कसा करावा?
उद्योजकता विकास प्रशिक्षण : ६ दिवस

उद्योजकीय व्यक्तिमत्त्व विकास
यशस्वी उद्योजकाशी संवाद
सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट
बाजारपेठ पाहणी आणि तंत्रे
उद्योगाची उभारणी
उद्योगाचे व्यवस्थापन
शासकीय कर्ज आणि अनुदान योजना
बँकेची भूमिका आणि योजना
अभिप्रेरणा प्रशिक्षण (AMT)
PPR आणि DPR तयार करणे (डीटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट)
उद्योगांना भेटी
प्रवेश अर्जासोबत खालील कागदपत्रांच्या छायांकित प्रती (झेरॉक्स कॉपी) जोडाव्यात.

वयोमर्यादा २१ ते ५० वर्षे
शैक्षणिक पात्रता : किमान बारावी पास, पदवी व तांत्रिक शिक्षण असल्यास प्राधान्य
जातीचा उल्लेख असलेल्या कोणत्याही शासकीय कागदपत्राचा पुरावा
अंतिम शिक्षणाची मार्कलिस्ट देणे आवश्यक
शाळा सोडल्याचा दाखला
महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असल्याचे (Domicile Certificate) तहसीलदार यांचे प्रमाणपत्र
आधार कार्ड, पॅन कार्ड
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असल्याचा उत्पन्नाचा दाखला
विवाहित महिला असल्यास : गॅझेट / विवाह प्रमाणपत्र / पॅनकार्डची प्रत
प्रवेश अर्ज व सर्व आवश्यक कागदपत्रे संबंधित एमसीईडी जिल्हा कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे.
(प्रत्येक तालुक्यातील उमेदवारांच्या अर्जांना प्रधान्य देऊन निवड करण्यात येईल.)

अधिक माहितीसाठी संपर्क :

प्रशांत जोशी
जिल्हा व्यवस्थापक, अमृत, कोल्हापूर
9112228764

वनिता पाटील
प्रकल्प अधिकारी, कोल्हापूर
9422810863/9730560570

प्रवीण कायंदे
प्रकल्प अधिकारी, एमसीईडी उद्योगभवन, कोल्हापूर
9403078774/9922963096

आलोक मिश्रा
विभागीय अधिकारी, एमसीईडी पुणे

कार्यालय पत्ता – महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र,
३१५, ई वॉर्ड, दत्ताजी चेंबर्स, हॉटेल मराठा रिजेन्सीजवळ,
बाबा मोटर्सच्या वर, कोल्हापूर ४१६००१

प्रशिक्षणस्थळ – कॉन्टिनेन्टल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट,
प्लॉट नंबर १३६, शास्त्रीनगर रोड, वाय. पी. पोवार
नगर, कोल्हापूर

Publisher: Prashant Joshi News publisher name | Date: 12-12-2025 News publication date | Time: 12:00 AM News publication time | Views: 30 Number of times this news has been viewed | District: kolhapur Related district of the news
Publisher: Prashant Joshi News publisher name | Date: 12-12-2025 News publication date | Time: 12:00 AM News publication time | Views: 30 Number of times this news has been viewed | District: kolhapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words