छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अमृत संस्थेच्या गडचिरोली कार्यालयात साजरी

लक्ष्यित गटातील घटकांना देण्यात आली अमृत संस्थेच्या योजनांची माहिती

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अमृत संस्थेच्या गडचिरोली कार्यालयात साजरी मुख्य फोटो
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अमृत संस्थेच्या गडचिरोली कार्यालयात साजरी अतिरिक्त फोटो

गडचिरोली : जाणता राजा अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या गडचिरोली जिल्हा कार्यालयात साजरी करण्यात आली. अमृत संस्थेचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि मान्यवरांनी राजांचे स्मरण केले आणि त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.

या वेळी अमृतपेठ, अमृत उद्योजकता विकास कार्यक्रम प्रशिक्षण यांसह संस्थेच्या विविध योजनांची माहिती देण्याकरिता संस्थेच्या लक्ष्यित गटातील समाजाच्या अध्यक्षांची बैठक घेण्यात आली. अमृत संस्थेचे जिल्हा उपव्यवस्थापक गौरव दुपल्लीवार, अमृतसखी (समन्वयक) सौ. माधुरी रोटकर, तसेच प्रशांत तामेवार, सौ. जयश्री केतकर, सौ. पूजा भारद्वाज व सौ. सोनाली महाजन आदींसह अन्य या वेळी उपस्थित होते.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/

Publisher: Gaurav Dupalliwar News publisher name | Date: 20-02-2026 News publication date | Time: 12:34 PM News publication time | Views: 69 Number of times this news has been viewed | District: gadchiroli Related district of the news
Publisher: Gaurav Dupalliwar News publisher name | Date: 20-02-2026 News publication date | Time: 12:34 PM News publication time | Views: 69 Number of times this news has been viewed | District: gadchiroli Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words