परतवाडा : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या योजनांची माहिती देणारे केंद्र अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर तालुक्यातील परतवाडा येथे सुरू झाले आहे.
परतवाडा : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या योजनांची माहिती देणारे केंद्र अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर तालुक्यातील परतवाडा येथे सुरू झाले आहे. संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांच्या हस्ते रोहित पांडे यांच्या सेतू केंद्रामध्ये या अमृत माहिती केंद्राचे उद्घाटन झाले. लक्ष्यित गटाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अमृत संस्थेतर्फे राबवल्या जात असलेल्या विविध योजनांची माहिती या केंद्राद्वारे तालुक्यातील इच्छुक लाभार्थ्यांना मिळणार आहे.
उद्घाटनप्रसंगी बोलताना विजय जोशी यांनी उपस्थितांना अमृत संस्थेची संकल्पना, कार्यपद्धती आणि उद्दिष्टे याबाबत सविस्तर माहिती दिली. ‘उद्योजक घडवणे हे अमृत संस्थेचे मुख्य ध्येय असून, युवकांनी आत्मनिर्भर बनून उद्योजकतेकडे वळावे,’ असे आवाहन त्यांनी केले. ‘अमृत’सोबत नवा संकल्प घेऊन समाजात सकारात्मक बदल घडवावेत, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
या कार्यक्रमाला संस्थेचे प्रबंधक संचालक सिद्धेश्वर वरणगावकर, राज्य व्यवस्थापक दीपक जोशी, नाशिक विभाग व्यवस्थापक मंगेश खाडिलकर, अमरावती विभाग व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर, अमरावती जिल्हा व्यवस्थापक केदार गोगरकर, तसेच अमरावती जिल्हा उप-व्यवस्थापक हृषीकेश कथलकर उपस्थित होते. या वेळी लक्ष्यित गटातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून योजनांची माहिती जाणून घेतली. ब्राह्मण समाज व मारवाडी समाजातील अनेक मान्यवर नागरिकही या कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी विजय जोशी यांनी रोहित पांडे यांना अमृत माहिती केंद्राच्या यशस्वी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment