अमृत संस्थेतर्फे फॅशन डिझायनिंगचे मोफत प्रशिक्षण; जालन्यात नोंदणी सुरू

जालना : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे जालन्यात फॅशन डिझायनिंग व संबंधित व्यवसायांचा मोफत प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जाणार आहे. त्यासाठी नावनोंदणी सुरू आहे. या कोर्सच्या माध्यमातून इच्छुक लाभार्थ्यांना फॅशन डिझायनिंग क्षेत्रात उज्ज्वल भविष्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

फोटो उपलब्ध नाहीत

या बातमीशी संबंधित कोणतेही फोटो उपलब्ध नाहीत

जालना : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे जालन्यात फॅशन डिझायनिंग व संबंधित व्यवसायांचा मोफत प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जाणार आहे. त्यासाठी नावनोंदणी सुरू आहे. या कोर्सच्या माध्यमातून इच्छुक लाभार्थ्यांना फॅशन डिझायनिंग क्षेत्रात उज्ज्वल भविष्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

फॅशन डिझायनिंग क्षेत्रात रोजगार आणि उद्योगाच्या वाढत्या संधींचा लाभ तरुण, युवक-युवती, व्यापारी व उद्योजकांनी घ्यावा, तसेच नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा विद्यमान व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी त्यांना आवश्यक ज्ञान आणि मार्गदर्शन करणे हा या प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्देश आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये खालील बाबींचा समावेश आहे.

फॅशन डिझायनिंगमधील व्यवसायसंधी
बाजारपेठेची निवड व ट्रेंडचा अभ्यास
आयात-निर्यात व्यवसायाचे मूलभूत ज्ञान
लॉजिस्टिक्स व पुरवठा साखळी व्यवस्थापन
ऑनलाइन व्यापार तंत्रज्ञान
विविध शासकीय योजना आणि आर्थिक साह्य
तज्ज्ञांचे मार्गदर्शन व उद्योग क्षेत्राशी नेटवर्किंग
व्यवसाय स्थापनेसाठी तांत्रिक साह्य

व्यवसाय सुरू करण्यासाठी अथवा असलेल्या व्यवसायाच्या विस्तारासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजपरतावा योजनेचा लाभही प्रशिक्षणार्थींना मिळणार आहे.

कोणाला घेता येणार या प्रशिक्षणाचा लाभ?
- खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक
- कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी
- ज्या खुल्या प्रवर्गातील जातींना स्वतंत्र शासकीय विभाग, संस्था किंवा महामंडळामार्फत योजनांचा लाभ मिळत नाही अशांसाठी ही योजना आहे.

'अमृत'च्या लक्ष्यित गटातील जाती :
ब्राह्मण, मारवाडी, सिंधी, बनिया, राजपुरोहित, कम्मा, कायस्थ, ऐयागर, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, ठाकूर, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, कानबी, राजपूत, कोमटी इत्यादी.

संपर्क व नोंदणीसाठी :
जालना जिल्हा व्यवस्थापक : नितीन खेकाळे - 91302 83058
जालना जिल्हा उपव्यवस्थापक : चिंतेश जोशी - 94219 44752
सत्यम अग्रवाल - 9881086777

जिल्हा कार्यालयाचा पत्ता :
विशाल कॉर्नर, चंदनझिरा, जालना

अधिक माहितीसाठी :
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in

Publisher: Nitin Khekale News publisher name | Date: 17-12-2025 News publication date | Time: 12:00 AM News publication time | Views: 116 Number of times this news has been viewed | District: jalna Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words