वर्ध्यातील विद्यार्थ्याला टायपिंग परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर अमृत संस्थेकडून १३ हजारांचा लाभ

स्पर्धा परीक्षेच्या स्वप्नांना मिळाले नवे बळ

वर्ध्यातील विद्यार्थ्याला टायपिंग परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर अमृत संस्थेकडून १३ हजारांचा लाभ मुख्य फोटो
मुख्य फोटो

वर्धा : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनाच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या स्वायत्त संस्थेतर्फे विविध कौशल्यविकास व अर्थसाह्य योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहेत. त्याअंतर्गत जीसीसी-टीबीसी (शासकीय टायपिंग व शॉर्टहँड) परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शुल्कपरताव्याच्या स्वरूपात आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा लाभ वर्धा शहरातील सुमित रमाकांत मोरोने यांनी घेतला आहे.

सुमित मोरोने इंग्रजी टायपिंग (३० व ४० शब्दगती) शासकीय परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले. कौशल्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या या यशानंतर अमृत संस्थेकडून त्यांना १३ हजार रुपयांचा शुल्कपरतावा प्रदान करण्यात आला. आर्थिक अडचणी असूनही शिक्षणाची वाटचाल सुरू ठेवण्यासाठी ही मदत अत्यंत मोलाची ठरल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

सध्या सुमित स्पर्धा परीक्षांची तयारी करत असून टायपिंग कौशल्यामुळे शासकीय सेवेकडे वाटचाल करण्याचा त्यांचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला आहे. अमृत संस्थेच्या या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना आवश्यक पात्रता व कौशल्ये मिळत असून, रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत. 

जिल्ह्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी अशा योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेचे वर्धा जिल्हा व्यवस्थापक ऋषिकेश खराटे यांच्याकडून करण्यात आले आहे. अमृत संस्थेमार्फत प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि आर्थिक साह्य या तिन्ही स्तरांवर विद्यार्थ्यांना सक्षम करण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Rushikesh Kharate News publisher name | Date: 11-02-2026 News publication date | Time: 04:14 PM News publication time | Views: 152 Number of times this news has been viewed | District: wardha Related district of the news
Publisher: Rushikesh Kharate News publisher name | Date: 11-02-2026 News publication date | Time: 04:14 PM News publication time | Views: 152 Number of times this news has been viewed | District: wardha Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words