सोलापूरच्या गौरी केळकर यांच्या ‘टूर अँड ट्रॅव्हल्स’ व्यवसायाला भरारी; अमृत संस्थेचे मानले आभार!

सोलापूरच्या गौरी केळकर यांच्या ‘टूर अँड ट्रॅव्हल्स’ व्यवसायाला भरारी; अमृत संस्थेचे मानले आभार!

सोलापूरच्या गौरी केळकर यांच्या ‘टूर अँड ट्रॅव्हल्स’ व्यवसायाला भरारी; अमृत संस्थेचे मानले आभार! मुख्य फोटो
मुख्य फोटो

सोलापूरच्या गौरी केळकर यांच्या ‘टूर अँड ट्रॅव्हल्स’ व्यवसायाला भरारी; अमृत संस्थेचे मानले आभार! सोलापूर: महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या ‘अमृत पर्यटन’ या उपक्रमाला उद्योजकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. समर्थ अपार्टमेंट, दत्त चौक, दक्षिण कसबा, सोलापूर येथील रहिवासी सौ. गौरी विश्वास केळकर यांनी ‘अमृत पर्यटन’ पोर्टलवर नोंदणी केली होती. या नोंदणीमुळे त्यांच्या टूर अँड ट्रॅव्हल्सच्या व्यवसायाला खूप मोठा फायदा झाला असून ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

गौरी केळकर यांनी अमृत पोर्टलवर आपल्या व्यवसायाची नोंदणी केल्यानंतर राज्यभरातून अनेक पर्यटकांनी त्यांच्याशी संपर्क साधला. नोंदणीमुळे थेट नवीन ग्राहक मिळण्यास मदत झाली असून त्यांचा ट्रॅव्हल्स व्यवसाय अत्यंत वेगाने वाढत आहे.

​या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना सौ. केळकर यांनी सांगितले की, “अमृतच्या अधिकृत पोर्टलवर रजिस्ट्रेशन केल्यामुळे मला मोठ्या प्रमाणावर चौकशीचे कॉल्स आले आणि व्यवसायाला एक नवी ओळख मिळाली.”

उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या आणि नाविन्यपूर्ण व्यवसाय संधी उपलब्ध करून देणाऱ्या 'अमृत' संस्थेचे त्यांनी मनापासून आभार मानले आहेत. स्थानिक व्यावसायिकांनी आणि पर्यटनाशी संबंधित उद्योजकांनी अमृतच्या या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/ अमृत (AMRUT) जिल्हा कार्यालय, १०८-ए, श्री साई बिल्डिंग, तिसरा मजला, यतिराज हॉटेलजवळ, सात रस्ता, सोलापूर - ४१३००१. संपर्क:- ९११२२२८७६८

Publisher: ARYA KULKARNI News publisher name | Date: 24-08-2026 News publication date | Time: 11:40 AM News publication time | Views: 11 Number of times this news has been viewed | District: Solapur Related district of the news
Publisher: ARYA KULKARNI News publisher name | Date: 24-08-2026 News publication date | Time: 11:40 AM News publication time | Views: 11 Number of times this news has been viewed | District: Solapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement