सोलापुरातील व्यावसायिक प्रसाद अनिल कुलकर्णी'अमृत पर्यटन'च्या नोंदणीमुळे व्यवसायाला भरघोस प्रतिसाद; मानले 'अमृत'चे आभार.
सोलापुरातील व्यावसायिक प्रसाद अनिल कुलकर्णी'अमृत पर्यटन'च्या नोंदणीमुळे व्यवसायाला भरघोस प्रतिसाद; मानले 'अमृत'चे आभार. सोलापूर: महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेच्या 'अमृत पर्यटन' उपक्रमांतर्गत नोंदणी केल्यामुळे सोलापूर येथील व्यावसायिक श्री. प्रसाद अनिल कुलकर्णी यांच्या व्यवसायाला मोठी चालना मिळाली आहे. भारतीय विद्यापीठ कॉलेज, जुळे सोलापूर परिसरातील रहिवासी असलेल्या प्रसाद कुलकर्णी यांनी 'अमृत पर्यटन' प्लॅटफॉर्मवर आपल्या व्यवसायाची नोंदणी केली होती. या नोंदणीनंतर त्यांच्या व्यवसायाला ग्राहकांकडून अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळत असून व्यवसायाचा विस्तार होण्यास मोठी मदत झाली आहे. 'अमृत पर्यटन' उपक्रमामुळे स्थानिक व्यावसायिकांना नवीन ओळख आणि मोठी बाजारपेठ उपलब्ध होत आहे. व्यवसायात झालेल्या या उल्लेखनीय वाढीमुळे प्रसाद अनिल कुलकर्णी यांनी 'अमृत' संस्थेचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. अमृत (AMRUT) जिल्हा कार्यालय, १०८-ए, श्री साई बिल्डिंग, तिसरा मजला, यतिराज हॉटेलजवळ, सात रस्ता, सोलापूर - ४१३००१.
अधिक माहितीसाठी संपर्क:- ९११२२२८७६८
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment